Imran Patel Death: क्रिकेटच्या मैदानातून एक वाईट बातमी समोर येत आहे. सामन्यादरम्यान एका 35 वर्षीय क्रिकेटरचा अचानक मृत्यू झाला. बुधवारी रात्री पुण्यातील गरवारे स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या एका सामन्यादरम्यान ३५ वर्षीय व्यावसायिक क्रिकेटर इम्रान पटेलचा मृत्यू झाला. इम्रान पटेल यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिवसेंदिवस देशात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. फक्त मोठेच नाही तर अगदी लहान वयाच्या लोकांनाही ही समस्या जाणवत आहे. यामुळे सर्वच चिंतेत आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने तरुणांच्या मृत्यूच्या बातम्या रोज येत आहेत. दरम्यान एक घटना महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून समोर आली आहे. क्रिकेट मॅच खेळणाऱ्या तरुणाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
इम्रान पटेल हा क्रिकेटर सलामीवीर म्हणून फलंदाजीला आला होता. तो खेळ खेळत असतानाच त्याच्या छातीत आणि हातामध्ये दुखू लागलं. इम्रान पटेलने मैदानावरील पंचांना याची माहिती दिली. त्यांनी त्याला लगेच मैदान सोडण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, पॅव्हेलियनमध्ये परतत असताना इम्रान पटेल बेशुद्ध झाला.
हे ही वाचा: आज भिडणार भारत-पाकिस्तान, जाणून घ्या कुठे आणि कसा पहायचा सामना, IPL मध्ये करोडात विकला गेलेला खेळाडू खेळणार
सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू असताना ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. इम्रान बेशुद्ध होताच मैदानावर उपस्थित इतर खेळाडू त्याच्या दिशेने धावले. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी इम्रानला मृत घोषित केले.
हे ही वाचा: लिलावात अनसोल्ड राहणं जिव्हारी लागलं, 'या' भारतीय खेळाडूने घेतला मोठा निर्णय; क्रिकेट विश्वात खळबळ
A young man, Imran Sikandar Patel, died of a #heartattack while playing cricket in the Chhatrapati Sambhaji Nagar district of Maharashtra.https://t.co/aCciWMuz8Y pic.twitter.com/pwybSRKSsa
— Dee (@DeeEternalOpt) November 28, 2024
हे ही वाचा: Photos: यशस्वी जयस्वालचं मुंबईतील 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे आलिशान युरोप-इन्स्पायर घर बघितलं का?
इम्रानची तब्येत नेहमीच चांगली होती. त्यामुळे घडलेली घटना ही अनेकांसाठी आश्चर्यचकित करणारे होते. तो शारीरिकदृष्ट्या निरोगी होते, तरीही त्यांना हृदयविकाराचा झटका आला. इम्रान हा अष्टपैलू खेळाडू असल्याने संपूर्ण सामन्यात सक्रिय राहायचा. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागील कारणामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.