न्यूझीलंडने श्रीलंकेचा धुव्वा उडवला, १० विकेटने केली मात
श्रीलंकेचे १३७ रन्सचे आव्हान न्यूझीलंडने एकही विकेट न गमवता सहज पूर्ण केले.
लंडन : न्यूझीलंडने श्रीलंकेला १५० रन्सच्या आतच गुंडाळले. त्यामुळे न्यूझीलंडपुढे विजयासाठी माफक आव्हान होते. श्रीलंकेचे १३७ रन्सचे आव्हान न्यूझीलंडने एकही विकेट न गमवता सहज पूर्ण केले. न्यूझीलंडने १० विकेटने श्रीलंकेवर मोठा विजय मिळवला. सलामीवीर मार्टीन गप्टील आणि कॉलिन मुनरोने अर्धशतक झळकावत टीमचा विजय पक्का केला.
न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संघ केवळ १३६ रन्सवर गारद झाला. त्यानंतर मैदानात खेळण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडने सुरुवातीपासून चांगली कामगिरी केली. सलामीवीर मार्टीन गप्टील आणि कॉलिन मुनरोने अर्धशतक झळकावत टीमचा विजय पक्का केला. मार्टीन गप्टीलने नाबाद ७३ तर मुनरोने नाबाद ५८ धावा केल्या. न्यूझीलंडने विजयासाठी असलेले १३७ रन्सच आव्हान सहज पूर्ण केले. श्रीलंकेचा एकही गोलंदाज न्यूझीलंडच्या फलंजादांसमोर प्रभावी ठरु शकला नाही.
श्रीलंकेला १३६ रन्सवर रोखताना न्यूझीलंकडकडून मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या, तर ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, जेम्स निशम, मिशेल सँटनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. न्यूझीलंडने पहिल्याच षटकात श्रीलंकेला झटका दिला. मॅट हेन्रीने लहिरु थिरीमनेची विकेट घेतली. यानंतर करुणरत्ने आणि कुशल पेरेरा यांनी दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी केली. मात्र पेरेराची विकेट पडल्यानंतर श्रीलंकेच्या डावाला पुन्हा एकदा गळती लागली. मधल्या फळीतला एकही फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही.
कर्णधार दिमुथ करुणरत्नेने एक बाजू लावून धरली. करुणरत्नेने आपले अर्धशतक केले. या भागीदारीमुळे श्रीलंकेने शंभरचा डप्पा पार केला. न्यूझीलंड गोलंदाजानी श्रीलंकेच्या शेवटच्या फळीतील फलंदाजांना झटपट गुंडाळले. कर्णधार करुणरत्ने ५२ धावांवर नाबाद राहिला.