मुंबई: आतापर्यंत पावसामुळे सामना थांबवला किंवा काही समस्या उद्भवल्यानं सामना थांबला असं अनेकदा ऐकलं असेल पण रेफरीनं केलेल्या चुकीमुळे चक्क मैदानात सुरू असलेला सामना थांबवल्याची घटना समोर आली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामना नुसता थांबवलाच नाही तर पुन्हा नव्यान सुरू करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमका काय घडला प्रकार?


रेफरीनं दिलेल्या चुकीच्या टारगेटमुळे सामना अर्धावर थांबवल्याची घटना समोर आली आहे. न्यूझीलंड विरुद्ध बांग्लादेश सामना सुरू असताना हा प्रकार घडला. झालं असं की दोन्ही देशांमध्ये टी 20 सामना सुरू होता. त्याच वेळी पाऊस आल्यामुळे सामना थांबवावा लागला. त्यामुळे मग डकवर्थ लुईस सिस्टिमचा वापर करून पुढील सामना सुरू झाला आणि बांग्लादेशला टार्गेट देण्यात आलं. हे टार्गेट चुकीचं दिल्यामुळे सगळाच घोळ झाला.


बंग्लादेश संघानं जेव्हा सामना सुरू केला तेव्हा रेफरीनं त्यांना 16 ओव्हरमध्ये 148 धावांचं लक्ष्य असल्याचं सांगितलं. बांग्लादेशनं 9 चेंडू खेळले आणि सामना थांबवण्यात आला. रेफरीने त्यांना 148 ऐवजी 170 धावांचं नवीन टार्गेट दिलं. त्यामुळे मैदानावर गोंळधाचं वातावरण निर्माण झालं. 


न्यूझीलंडच्या संघानं पहिल्या फलंदाजीमध्ये 17.5 ओव्हर खेळून पूर्ण केले. त्यावेळी 173 धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईस सिस्टिमचा वापर करून रेफरीनं चुकीच टार्गेट दिल्यामुळे हा घोळ झाला आणि त्यामुळे बांग्लादेश संघाला पुन्हा एकदा सामना खेळावा लागला.