POINTS TABLE: वर्ल्ड कप 2023 ( ICC World Cup 2023 ) मध्ये न्यूझीलंड टीमच्या विजयाची धौडदौड सुरुच आहे. न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव करत सलग चौथा विजय मिळवला आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने 149 रन्सने अफगाणिस्तानचा पराभव केला. दरम्यान या विजयानंतर न्यूझीलंडच्या टीमने पॉईंट्स टेबलमध्ये ( ICC World Cup Points Table ) पुन्हा अव्वल स्थान पटकावलं आहे. दरम्यान न्यूझीलंडच्या या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये ( ICC World Cup Points Table ) मोठा उलटफेर झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 288 रन्स केले. यावेळी प्रत्युत्तरात 289 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या टीमला केवळ 139 रन्स करता आले. न्यूझीलंडने हा सामना 149 रन्सने जिंकला. या विजयासह न्यूझीलंडने गुणतालिकेत ( ICC World Cup Points Table ) पहिलं स्थान मिळवलंय. न्यूझीलंडच्या या विजयाने टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय.


पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली न्यूझीलंड


चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा 149 रन्सने पराभव केला. या विजयाच्या जोरावर न्यूझीलंडच्या टीमने पॉईंट्स टेबलमध्ये ( ICC World Cup Points Table ) मोठी झेप घेतली. 


न्यूझीलंडचे आतापर्यंत 4 सामने झाले असून चारही सामन्यांत त्यांना विजय मिळवणं शक्य झालंय. यामुळे त्यांच्या. यासोबतच न्यूझीलंडचा नेट रनरेटही +1.923 आहे. न्यूझीलंडची टीम ही सुरुवातीपासूनच सेमी फायनलची फेरी गाठण्यासाठी दावेदार असल्याचं मानली जाते. 


भारत आणि पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या


चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानवर विजय मिळवल्यानंतर वर्ल्डकप 2023 च्या पॉईंट्सटेबलमध्ये ( ICC World Cup Points Table ) अनेक बदल झालेत. यामुळे टीम इंडिया पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचलीये. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे आता 6 सामने बाकी आहेत. टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित करायचं असेल तर 6 पैकी 4 सामने जिंकावे लागणार आहेत.