राजकोट : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने ४० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने १-१ अशी बरोबरी साधलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर भारताची फलंदाजी पार ढेपाळली. भारताचा डाव सात बाद १५६ धावांवर आटोपला. भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. कोहलीने ४२ चेंडूत ६५ धावा केल्या तर धोनीने ४९ धावा केल्या. 


तत्पूर्वी, न्यूझीलंडने टॉस जिंकताना प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला आणि २० षटकांत दोन बाद १९६ धावा तडकावल्या. सलामीवीर कोलीन मुन्रो याने ५८ चेंडूत नाबाद १०९ धावा केल्या. यात त्याने ७ चौकार आणि ७ षटकार लगावले. तर त्याला साथ दिली मार्टिन गप्टिलने. त्याने ४५ धावा केल्या.