मुंबई : टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup 2021) टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध टी 20 मालिकेत भिडणार (New Zeland Tour India 2021) आहे. या टी 20 मालिकेसाठी न्यूझीलंड भारत दौऱ्यावर येणार आहे. निवड समिती न्यूझीलंड विरुद्धच्या या मालिकेसाठी नव्या दमाच्या शिलेदारांना पदार्पणाची संधी देणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरींनी प्रभावित केलं आहे. यापैकी ज्या खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळू शकते, त्या 5 स्टार खेळाडूंवर आपण नजर टाकुयात. (New Zealands India 2021 tour bcci selection committee could give young players a chance in the T20 series)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आवेश खान (Aavesh Khan)
 
निवड समितीची आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळणाऱ्या आवेश खानकडे लक्ष असणार आहे. आयपीएलच्या 14 व्या मोसमात दिल्लीला प्लेऑफपर्यंत पोहचवण्यात आवेशने निर्णायक भूमिका बजावली होती. आवेशने 16 सामन्यात 24 विकेट्स घेतल्या होत्या.


व्यंकटेश अय्यर (Vyanktesh Iyer)


व्यंकटेश अय्यरने 14 व्या हंगमातील दुसऱ्या पर्वात शानदार बँटिंग केली. मध्यप्रदेशच्या या 26 वर्षीय फलंदाजाने कोलकाताकडून 10 सामने खेळला. यामध्ये त्याने 128.47 च्या स्ट्राईक रेटने 370 धावा चोपल्या.   


हर्षल पटेल (Harshal Patel)


हर्षल पटेलने या 14 व्या हंगामात शानदार गोलंदाजी करत रेकॉर्ड ब्रेक केला. हर्षल आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर ठरला. हर्षलने या हंगामातील 15 सामन्यांमध्ये 32 विकेट्स पटकावल्या. यासह तो पर्पल कॅप होल्डर ठरला.


राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi)


केकेआरच्या राहुल त्रिपाठीनेही या मोसमात आपल्या कामगिरीने छाप सोडली. राहुलने 2017 मध्ये पुणे जायंट्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर राहुलने राजस्थानचं प्रतिनिधित्व केलं. यानंतर कोलकाताने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. राहुलने या मोसमातील 17 मॅचमध्ये 397 रन्स केल्या.


उमरान मलिक (Umran Malik)


जम्मूचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आयपीएलच्या पदार्पणातील सामन्यात बॉलिंगने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. उमरानने 150 किमीच्या वेगाने बॉल फेकला. यानंतरच्या पुढील सामन्यात त्याने स्वत:चा रेकॉर्ड ब्रेक केला. त्याने दुसऱ्या सामन्यात 152.95 च्या वेगाने बॉल टाकला. त्याने एकूण 3 सामन्यात 8 च्या इकॉनॉमीने 2 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होणार आहे. त्यामुळे निवड समिती या युवा खेळाडूंवर विश्वास दाखवून त्यांना पदार्पण करण्याची संधी देणार का, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.