ओव्हल : भारतीय क्रिकेट संघाने रविवारी ओव्हल मैदानावर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वॉर्मअप सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला १८९ धावांत रोखणे भारताला शक्य झाले. त्यानंतर शिखर धवन(४०) आणि कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद ५२ धावांच्या जोरावर भारताने विजय मिळवला. 


सामना थांबेपर्यंत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १७ धावांवर नाबाद १७ धावा केल्या. आपल्या १७ धावांच्या नाबाद खेळीतही त्याने आपली कमाल दाखवली. या खेळीत त्याने एक षटकार ठोकला ज्यामुळे न्यूझीलंडचे क्रिकेटपटूही हसू लागले. 


२५व्या षटकांत ट्रेट बोल्ट गोलंदाजी करत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर धोनीने मारलेल्या सिक्सरने न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनाही हसू आले. धोनीने टोलवलेला चेंडू सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेला कॉलिन डी ग्रँडहोम हवेत पकडू शकला असता. मात्र सीमारेषेवर तो झेल घेण्यास चुकला आणि तो षटकार ठरला. 


या षटकाराने धोनी विराटसह, गोलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनाही हसू आवरले नाही.