MI New York Vs Seattle Orcas MLC 2023: अमेरिकेत पहिल्यांदाच मेजर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सची फ्रँचायची असलेल्या MI न्यूयॉर्क संघाने (MI New York) जेतेपदाला गवसणी घातली आहे. फायनल सामन्यात वेस्ट इंडिजचा स्टार निकोलस पुरन याची बॅट तळपली. 10 फोर तर 13 सिक्सच्या मदतीने निकोलस पुरनने धुंवावार शतक ठोकलं. फक्त 55 बॉलमध्ये पूरनने 249 च्या स्टाईक रेटने 137 धावांची खेळी केली. त्यामुळे MI न्यूयॉर्कला फायनलमध्ये (MLC 2023 Final) एकहाती विजय मिळवता आला. मात्र, निकोलस पूरनसोबत (Nicholas Pooran) धोका झाल्याची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण स्पर्धेत 388 धावा करत निकोलस पूरन (Nicholas Pooran) हा मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या सत्रात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरलाय. मात्र, पैश्यांसाठी भारतविरुद्धची मालिका सोडून लीग स्पर्धा खेळणाऱ्या निकोलसवर टीका होताना दिसते. तर त्याच्या वादळी खेळीचं कौतुक देखील होतंय. निकोलसची खेळी व्यर्थ गेली, असं का म्हटलं जातंय? याचं कारण पाहूया...


निकोलससोबत धोका?


निकोलस पूरनने झंझावाती (Nicholas Pooran's Century) खेळी केली पण त्याची ही खेळी टी-ट्वेंटी क्रिकेट रेकॉर्डमध्ये जोडली जाणार नाही. अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटला अद्याप टी-ट्वेंटीचा अधिकृत दर्जा न मिळाल्याने आता याचे रेकॉर्डची गणना होणार नाही. अमेरिका आयसीसीचा (ICC) सदस्य आहे, मात्र, मोठ्या संस्थांकडून टी-ट्वेंटीचा दर्जा दिला गेला नाही. त्यामुळे कितीही मोठा विक्रम झाला तरी त्याचा रेकॉर्ड असणार नाही. लवकरच या लीगला मान्यता मिळवण्यासाठी अमेरिकेची खटपट सुरू आहे.



दरम्यान, सिएटल ऑर्कासने दिल्लेल्या आव्हानाला MI न्यूयॉर्क संघाने 16 ओव्हरमध्येच हे आव्हान पूर्ण करत मेजर क्रिकेटच्या पहिल्या पर्वातील विजेतेपदावर नाव कोरलंय. सिएटल ऑर्कासचा कर्णधार क्विंटन डिकॉकने याने 87 धावांची खेळी केली. तर ड्वेन प्रिटोरियसने 21 धावांची आक्रमक खेळी केली. त्याचबरोबर शुभम राजमाने 29 धावांचं योगदान दिलं.


सिएटल ऑर्कास (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (W), नौमन अन्वर, शेहान जयसूर्या, हेनरिक क्लासेन, शुभम रांजणे, इमाद वसीम, ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल (C), हरमीत सिंग, अँड्र्यू टाय, कॅमेरॉन गॅनन.


MI न्यूयॉर्क (प्लेइंग इलेव्हन): शायन जहांगीर, डेवाल्ड ब्रेविस, स्टीव्हन टेलर, निकोलस पूरन (w/c), टिम डेव्हिड, डेव्हिड विसे, रशीद खान, हम्माद आझम, नॉथुश केंजिगे, ट्रेंट बोल्ट, जसदीप सिंग.