कोलंबो : दक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर टीम इंडिया श्रीलंकेत होणाऱ्या ट्रायसीरिजसाठी दाखल झाली आहे. या ट्रायसीरिजमधील पहिली टी-२० मॅच श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया अशी रंगणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६ मार्चपासून श्रीलंकेत निडास ट्रॉफीची सुरुवात होत आहे. या टी-२० ट्राय सीरिजमध्ये भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. 


या सीरिजमध्ये कॅप्टन विराट कोहली, महेंद्र सिंग धोनी यांच्यासोबत इतरही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ६ मार्चपासून टूर्नामेंटला सुरुवात होणार आहे तर शेवटची मॅच १८ मार्च रोजी खेळली जाणार आहे.


या सीरिजसाठी टीम इंडियात वॉशिंगटन सुंदर, विजय शंकर, ऋषभ पंत, दीपक हुड्डा आणि मोहम्मद सिराज या युवा खेळाडूंना संधी देण्यात आलीय.


कधी आणि कुठे पहाल मॅच?


निडास ट्रॉफीत पहिली मॅच ६ मार्च रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. श्रीलंकेत होणारी ही मॅच भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सुरु होईल. सर्व मॅचेस या श्रीलंकेची राजधानी कोलंबोतील प्रेमदासा स्टेडिअममध्ये खेळल्या जाणार आहेत. या सीरिजचं थेट प्रक्षेपण नवा स्पोर्ट्स चॅनल डी स्पोर्ट्सवर केलं जाणार आहे. यासोबतच मॅचं प्रक्षेपण रिश्ते सिनेप्लेक्स नावाच्या चॅनलवरही केलं जाणार आहे.


टी-२० ट्रायसीरिजचं वेळापत्रक


६ मार्च- भारत विरुद्ध श्रीलंका


८ मार्च- भारत विरुद्ध बांग्लादेश


१० मार्च- श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश


१२ मार्च- भारत विरुद्ध श्रीलंका


१४ मार्च- भारत विरुद्ध बांग्लादेश


१६ मार्च- श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश


१८ मार्च- फायनल