India A vs Pakistan A: सध्या कोलंबो येथे खेळवल्या जात असलेल्या  भारत अ आणि पाकिस्तान अ या दोन्ही संघात इमर्जिंग टीम आशिया कप 2023 च्या फायनल (Emerging Teams Asia Cup 2023) सामन्यात जोरदार लढाई सुरू आहे. पाकिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 ओव्हरमध्ये दणक्यात 352 धावा केल्या. आता टीम इंडियाला फायनल जिंकण्यासाठी 50 ओव्हरमध्ये 353 धावा करायच्या आहेत. अशातच आता टीम इंडियाची सुरूवात खराब झाल्याचं दिसून आलं आहे. स्टार खेळाडू साई सुदर्शन (Sai Sudharsan) लवकर बाद झाल्याने सर्वांच्या चिंता वाढल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानने दिलेल्या 353 धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या विकेटसाठी अभिषेक शर्मा आणि साई सुदर्शने 64 धावांची भागेदारी केली. चांगला रिदम मिळवलेला साई 29 धावा करत बाद झाला. मात्र, अभिषेक शर्माने आक्रमण सुरू ठेवलं. साई बाद झाल्यावर मैदानात आलेल्या निकिन जोसला (Nikin Jose) चांगली खेळी करता आली नाही. तो केवळ 11 धावा करू शकला. मात्र, त्याला ज्यापद्धतीने बाद ठरवण्यात आलं. त्यावरून मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून येतंय.


नेमकं काय झालं?


साई सुदर्शन खेळत असताना अर्शद इक्बालच्या गोलंदाजीवर मोहम्मद हारिसकडे कॅच गेला. यावेळी बॅटचा एज लागलाच नव्हता, असं काही क्रिकेटप्रेमींचं म्हणणं आहे. तर निकिन जोसला बाद झाला त्यावेळी क्लियर कट नो बॉल (NO BALL) दिसत होता, असं देखील नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. त्यावरून आता सामन्यात फिक्सिंग तर झाली नाही ना? असा सवाल देखील सोशल मीडियावर उपस्थित होताना दिसत आहे.


पाहा Video



पाहा दोन्ही संघ (IND A vs PAK A) 


Pakistan A Squad


सैम अयुब, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, तय्यब ताहिर, कासिम अक्रम, मोहम्मद हरीस (C & WK), मुबासिर खान, मेहरान मुमताज, मोहम्मद वसीम जूनियर, अर्शद इक्बाल, सुफियान मुकीम.


India A Squad


साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, यश धुल (C), रियान पराग, निशांत सिंधू, ध्रुव जुरेल (WK), मानव सुथार, हर्षित राणा, राजवर्धन हंगरगेकर, युवराजसिंह डोडिया.