मुंबई : मुंबई विरुद्ध पंजाब झालेल्या सामनमध्ये सर्वात जास्त चर्चा ही नीता अंबानीची होती. मुंबईला 12 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई टीमचा सलग पाचवा पराभव झाला आहे. मुंबईने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. मात्र पंजाबने दिलेलं लक्ष्य पूर्ण करता आलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात नीता अंबानीची चर्चा होती. 13व्या ओव्हरदरम्यान मुंबई इंडियन्सकडून जयदेव उनादकट बॉलिंग करत होता. जॉनी बेयरस्टो बॅटिंगसाठी होता. त्याच्या तुफानी फलंदाजीला रोखण्यात जयदेवला यश आलं. 


बेयरस्टोला 12 धावांवर तंबुत पाठवण्यात जयदेव यशस्वी ठरला. याचा आनंद नीता अंबानीने साजरा केला. तिने आनंदाने टाळ्या वाजवल्या. नीता अंबानीची प्रतिक्रिया सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. 



दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यातही मुंबई टीमला स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाख रुपयांचा दंड भरावा लागला होता. आता पंजाब विरुद्ध सामन्यात पुन्हा एकदा रोहितला स्लो ओव्हर रेटसाठी दंड भरावा लागला आहे. कर्णधार रोहित शर्माला 24 लाख रुपयांचा दंड भरावा लागला. 


इतर सदस्यांना 6 लाख रुपये दंज आणि मॅच फीमधून 25 टक्के फी कापून घेतली जाणार आहे. नियमाचं दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यानं ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.