KKR vs PBKS Nitish Rana Viral Video: सोमवारी 8 मे रोजी पंजाब किंग्स (Punjab Kings) विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सामना रंगला होता. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात कोलकात्याने बाजी मारली आणि विजय मिळवला. या विजयानंतर कोलकात्याचा कर्णधार नीतीश राणा (Nitish Rana) फार खुश दिसून आला. मात्र सामना सुरु असताना नीतीशचा रूद्र अवतार पहायला मिळाला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज (KKR vs PBKS) यांच्यात IPL 2023 (IPL 2023) मधील 53वा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात नितीश राणाच्या टीमने पंजाब किंग्सवर 5 विकेट्ने विजय मिळवला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात अखेर कोलकाताच्या रिंकू सिंहने विजय मिळवून दिला. शेवटच्या बॉलवर कोलकाताला विजयासाठी 2 रन्सची गरज होती. यावेळी रिंकूने फोर मारून पुन्हा स्वतःला सिद्ध करून दाखवलं. 


अंपायरसोबत भिडला राणा


मात्र या सामन्यामध्ये नीतीश राणा आणि अंपायर यांच्यामद्ये बिनसलेलं दिसलं. हा सर्व प्रकार 13 व्या ओव्हरमध्ये दिसून आला. यावेळी नीतीश संतापाच्या भरात अंपायरला काही बोलून गेल्याचं दिसून आलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 


झालं असं की, 13 व्या ओव्हरमध्ये सॅम करण गोलंदाजी करत होता. यावेळी सॅमने एक बॉल वाइड स्टंपच्या बाहेट टाकला. हा बॉल पाहिल्यानंतर नीतीशला वाटलं की, अंपायर हा बॉल वाईड देतील. मात्र असं घडलं नाही. यावर अंपायरने कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं. दरम्यान अंपायरचा हा निर्णय नीतीश राणाला अजिबात पटला नाही. आणि तो अंपारशी बेशिस्तीने वागू लागला. 



पंजाबविरूद्ध नीतीश राणाची उत्तम खेळी


पंजाबविरूद्धच्या सामन्यात नीतीश राणाने उत्तम खेळी केली. जेसन रॉय बाद झाल्यानंतर नीतीश फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी त्याने 38 बॉल्समध्ये 51 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. या सामन्यात नीतीशने कॅप्टनला साजेशी अशी खेळी केली. अखेरीस रिंकू मैदानावर उतरत पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्सला विजयाच्या वाटेवर नेलं.