CWG 2022 : बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेत पहिल्यांदाच प्रवेश करणाऱ्या नितू घनघसने सुवर्णपदक जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले. भारताच्या या मुलीने 48 किलो गटात इंग्लंडच्या डेमी जेडचा पराभव केला. 
 
महिलांच्या 45-48 किलो गटाच्या अंतिम फेरीत नितूने जागतिक चॅम्पियनशिप 2019 मधील कांस्यपदक विजेत्या रेझाटन डेमी जेडचा 5-0 असा पराभव केला. नितूने तिच्या कॉमनवेल्थ स्पर्धेतील पदार्पणातच मोठ्या आत्मविश्वासासह हा सामना खेळला आणि जिंकला. नितूने चढाईच्या तीनही फेऱ्यांमध्ये पूर्ण नऊ मिनिटे नियंत्रण राखले आणि विरोधी बॉक्सरला कोणतीही संधी दिली नाही. नीतूने धारदार, अचूक ठोसे मारून प्रतिस्पर्ध्याला थक्क केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितू हरियाणाच्या त्याच भिवानी जिल्ह्यातून आली आहे, ज्याने विजेंदर कुमारसारखे अनेक पदक विजेते बॉक्सर देशाला दिले. नितूच्या या यशामागे तिची धडपड आणि मेहनत आहे. तसेच घरच्यांनीही मोलाची साथ दिली.


वडिलांनी नोकरी पणाला लावली


नितूचे वडील जयभगवान हरियाणा सचिवालयात काम करायचे. आपल्या मुलीला बॉक्सर बनवण्यासाठी त्यांनी आपली नोकरी पण पणाला लावली.  नितूच्या प्रशिक्षणामुळे वडिलांना दीर्घ रजा घ्यावी लागली. त्यामुळे त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू आहे. अनेक वर्षांपासून पगारही मिळाला नव्हता, मात्र आज या मुलीने पदक जिंकून कुटुंबासह देशाचे नाव उंचावले आहे.


नितूला पूर्ण वेळ देणे आवश्यक आहे हे लक्षात आल्यानंतर जयभगवान चार वर्षे पगाराशिवाय रजेवर राहिले. रजा घेण्याचे कारण म्हणजे त्यांना नितूला गावातून भिवानी बॉक्सिंग क्लबमध्ये घेऊन जावे लागत होते. त्यासाठी दररोज 20 किलोमीटरचा प्रवास बसने करणे आवश्यक होते.


आपल्या मुलीला बॉक्सर बनवून घर चालवण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी नातेवाईक आणि मित्रांकडून जयभगवान यांनी पैसे उसनेही घेतले होते.


करिअरची सुरुवात होण्याआधीच खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे नितूची कारकीर्द अडचणीत आली होती. दीर्घ उपचारांनंतर २०२१ मध्ये नितूने पुनरागमन केले. त्यानंतर आता सुवर्णपदक जिंकत तिने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.