मुंबई : दिल्ली विरुद्ध राजस्थान झालेल्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. राजस्थान टीमने 15 धावांनी दिल्लीचा पराभव केला. शेवटच्या ओव्हरमध्ये अंपायरने दिलेल्या एका निर्णयामुळे वाद झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंपायर नितीन मेनन यांच्या निर्णयानंतर ऋषभ पंत संतापला. त्याने 2 खेळाडूंना मैदान सोडायला सांगतिलं होतं. त्यावरून मैदानात हायव्होल्टेज ड्रामा रंगला. एवढंच नाही तर स्टेडियममध्ये उपस्थित क्रिकेटप्रेमींनीही घोषणा द्यायला सुरुवात केली. 


स्टेडियममध्ये क्रिकेटप्रेमींनी अंपायरविरोधात घोषणा दिल्या. चिटर चिटर एकच आवाज काही वेळ स्टेडियममध्ये घुमला. क्रिकेटप्रेमींनीही अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.


नेमकं काय प्रकरण? 
शेवटच्या ओव्हरमध्ये तिसरा बॉल हा नो बॉल असल्याचा दावा पंतने केला. मात्र तो फुलटॉस असल्याने नो बॉल न दिल्याचं संजू सॅमसननं सांगितलं. अंपायरने नो बॉल नाही असा निर्णय दिला. त्यावर पंत वैतागला. त्याने तिथे ड्रामा सुरू केला. थर्ड अंपायरचा निर्णय देखील यामध्ये पाहिला नाही. त्यामुळे रागाने पंतने खेळाडूंना मैदान सोडण्यास सांगितलं. 


पंत, शार्दूल ठाकूर आणि असिस्टंट कोच प्रवीण आम्रे यांच्यावर नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अशाप्रकारचं वर्तन हे नियमबाह्य असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.