मुंबई : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa T20I Series) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होतेय. या सीरिजआधी बीसीसीआयने (Bcci) मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच मोठ्या कटकटीतून खेळाडूंची सुटका झाली आहे. यामुळे क्रिकेटपटूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे. (no bio bubble restrictions in india vs south africa t 20 series bcci secretary jay shah big decision) 


नक्की निर्णय काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने बायो-बबलचं (Bcci Bio-Bubble) निर्बंध शिथिल केले आहेत. बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे आता 2 वर्षांनंतर टीम इंडिया पहिल्यांदा बायो-बबलमध्ये राहणार नाही.  कोव्हिडनंतर टीम इंडियाला प्रत्येक द्विपक्षीय मालिकेत बायो-बबलमध्ये रहावं लागलं होतं. मात्र असं असलं तरी खेळाडूंची नियमितपणे कोरोना चाचणी केली जाणार आहे.


खेळाडूंना मोठा दिलासा


जगावर गेल्या 3 वर्षात कोरोनाचं संकट होतं. मात्र आयसीसी आणि इतर क्रिकेट संघटनांकडून सर्व खबरदारी घेत सामन्यांचं आयोजन करण्यात येत होतं. त्यामुळे सीरिजआधी दोन्ही खेळाडूंना स्थानिक नियमांनुसार ठराविक काही दिवस बायो-बबलमध्ये रहावं लागत होतं. 


बायो-बबलमध्ये खेळाडूंच्या कुटुंबियांना सोबत राहण्याची परवानगी नसते. त्यामुळे बायो-बबलमध्ये राहणं खेळाडूंसाठी आव्हानात्मक असतं. तसेच बायो-बबलमध्ये खेळाडूंच्या शारिरीक-मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम व्हायचा. 


इतकंच नाही तर सीरिजच्या काही दिवसांआधी खेळाडूंना बायो-बबलमध्ये रहावं लागतं. मात्र आता बीसीसीआयने बायो-बबल प्रतिंबध हटवल्याने खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे. 


टी20 सीरीजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्वींटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिक नोर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी वॅन डेर डूसन आणि मार्को जेन्सन.


टीम इंडिया : केएल राहुल (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, वाय चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.