IPL 2024 : `तुला वर्ल्ड कप खेळायचाय, आयपीएलपासून लांब रहा`, मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला तंबी!
IPL 2024 Auction : इंग्लंड क्रिकेट बोर्डने (ECB) आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या (T20 World Cup 2024) तयारीसाठी दुखापतीने त्रस्त राहिलेल्या वेगवान गोलंदाजावर कामाचा ताण व्यवस्थापित करण्याच्या प्रयत्नात जोफ्रा आर्चरला आगामी इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL 2024) बाहेर बसण्याचे निर्देश दिले आहेत.
ECB advises Jofra Archer : वर्ल्ड कपनंतर आता आयपीएलची सर्वांना उत्सुकता लागली आहे. बीसीसीआयच्या (BCCI) निर्देशानुसार आयपीएलच्या सर्व संघांनी रिलीज खेळाडूंची यादी जाहीर केली. त्यामुळे आयपीएल लिलावामध्ये (IPL 2024 Auction) कोणाला संधी मिळणार? असा सवाल विचारला जातोय. दुबईत 19 डिसेंबर रोजी ऑक्शन पार पडणार आहे. या ऑक्शनसाठी एकूण 1 हजार 166 खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलंय. अशातच आता इंग्लंडमधून धक्कादायक माहिती समोर आलीये. आयपीएलआधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डने (ECB) आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या (T20 World Cup 2024) तयारीसाठी दुखापतीने त्रस्त राहिलेल्या वेगवान गोलंदाजावर कामाचा ताण व्यवस्थापित करण्याच्या प्रयत्नात जोफ्रा आर्चरला आगामी इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL 2024) बाहेर बसण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चर याला नुकतंच करारमुक्त केलं होतं. त्यानंतर आता जोफ्राला खेळता येणार नसल्याचं समजतंय.
जोफ्रा आर्चर याला आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने 8 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं होतं. इंग्लंड क्रिकेटच्या या निर्णयानंतर जोफ्रा आर्चरला इच्छा असतानाही आयपीएल खेळता येणार नाही. नियमांनुसार, प्रत्येक खेळाडूला विदेशातील क्रिकेट लीग स्पर्धेत खेळण्यासाठी बोर्डाची एनओसी अर्थात ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असतं. त्यामुळे आर्चरला आयपीएल खेळता येणार नाहीये.
दरम्यान, टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी जोफ्रा आर्चर महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. दुखापतीमुळे आर्चरला यंदाचा वनडे वर्ल्ड कप खेळता आला नव्हता. त्यामुळे इंग्लंडला मोठा तोटा झाल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडने 'नो आयपीएल'ची मोहिम राबवली आहे. इंग्लंड क्रिकेटने निर्णय घेतला आहे. मात्र, बीसीसीआय असा निर्णय घेण्याची हिंमत दाखवणार का? असा सवाल विचारला जातोय.