मुंबई : भारत न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. यामध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी टेस्ट मॅच 3 डिसेंबर 2021 पासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र या दरम्यान, क्रिकेट चाहत्यांसाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे.


अवकाळी पावसामुळे कसोटी मॅचवर गदा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील अवकाळी पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दुसर्‍या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ रद्द होऊ शकतो. पावसामुळे वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल असेल अशी अपेक्षा आहे. 


ट्रेनिंग सेशन रद्द


1 डिसेंबर रोजी, दिवसभर पावसामुळे दोन्ही संघांना त्यांचं सराव सत्र रद्द करावं लागलं. गुरुवारीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून मैदान ओलं राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भारतीय टीम बांद्रा कुर्ला कॅम्पस मैदानावर जाईल जेथे इनडोअर ट्रेनिंगची सोय आहे.


खेळपट्टीवर ओलावा


वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर गवत नसल्याने स्लो गोलंदाजांना मदत होईल. मात्र, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटीत वानखेडेची खेळपट्टी वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू दोघांनाही मदत करेल अशी अपेक्षा आहे. संततधार पावसामुळे खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली असून त्यामुळे पृष्ठभागाखाली भरपूर आर्द्रता राहील.


वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल


वानखेडेच्या खेळपट्टीवर अतिरिक्त ओलावा असल्याने वेगवान गोलंदाजांना नक्कीच मदत मिळेल. परंतु अशा विकेटमुळे फिरकीपटूंनाही मदत मिळणार आहे. शुक्रवारीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.