Hardik Pandya नाही तर `हा` खेळाडू होणार टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन, जहीर खान स्पष्टच बोलला!
Zaheer Khan On Hardik Pandya : रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) मुंबईसाठी राखीव कॅप्टन ठेवण्याची खेळी पटलणने (Mumbai Indians) केलीये. त्यामुळे आता हार्दिक पांड्याकडे आगामी टीम इंडियाच्या कॅप्टनच्या रुपात देखील पाहिलं जातंय.
Hardik Pandya In Mumbai Indians : गुजरात टायटन्सचा सेनापती पांड्या याचं (Hardik Pandya) मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक स्वागत करण्यात आलंय. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) ट्रेडिंग विन्डो नियमानुसार हार्दिक पांड्याला आपल्या संघात सहभागी करुन घेतलं. रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) मुंबईसाठी राखीव कॅप्टन ठेवण्याची खेळी पटलणने केलीये. त्यामुळे आता हार्दिक पांड्याकडे आगामी टीम इंडियाच्या कॅप्टनच्या रुपात देखील पाहिलं जातंय. अशातच आता आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या (T20 World cup 2024) पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा वर्ल्ड कप स्टार जहीर खान (Zaheer Khan) याने मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाला Zaheer Khan ?
2024 च्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माने सांभाळावं, अशी इच्छा जहीर खान याने व्यक्त केली आहे. रोहित ही अशी व्यक्ती आहे जी, आजकाल संघाच्या खूप जवळ आहे. परिस्थिती आणि दबाव कसं हाताळायचं हे त्याला माहीत आहे. बाकीच्या नावांचा विचार करण्यासाठी तुमच्याकडे बराच वेळ आहे, असं जहीर खान म्हणतो.
आता टी-20 विश्वचषक सुरू होण्यासाठी फक्त सहा महिने उरले आहेत. दरम्यान, आयपीएल सारखी मोठी स्पर्धा होणार आहे, ज्यामुळे तयारी मजबूत होण्यास खूप मदत होईल. अशा परिस्थितीत माझ्या मते, रोहित शर्मा की हार्दिकच्या पुनर्वसनावर आणि पुनरागमनावरही ते अवलंबून असेल. हे आव्हानत्मक आहे की हार्दिकला अनेक सामने खेळण्याची संधी मिळणार नाही.
आणखी वाचा - IPL 2024 : हार्दिकचा तो न्याय, मग जडेजावर का अन्याय? BCCI ने का घातली होती बंदी?
दरम्यान, हार्दिक पांड्याने टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये सहा सामन्यांत टीम इंडियाची कमान सांभाळली आहे. या सहा सामन्यांपैकी हार्दिकने टीम इंडियाला 5 मध्ये विजय मिळवून दिला, तर एक सामना बरोबरीत संपला. त्यामुळे आत्तापर्यंत त्याने पराभवाची धूळ चाखली नाही. तर गुजरात टायन्टसचं कर्णधारपद सांभाळताना हार्दिकने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे आता बीसीसीआय (BCCI) या सर्व प्रकरणावर कसा निर्णय घेणार? आणि रोहितवर पुन्हाविश्वास दाखवणार का? असा सवाल विचारला जातोय.