IND Vs Pak : एकमेकांच्या देशात खेळायला तयार नाहीत, मग कुठे रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना? मोठी अपडेट समोर!
Asia Cup 2023 Schedule : 31 ऑगस्टपासून एशिया कपची ( Asia Cup 2023 ) सुरुवात होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये आशिया कपच्या ( Asia Cup 2023 ) शेड्यूल जाहीर करण्यात येईल. दरम्यान यावेळी भारत पाकिस्तान सामना कुठे रंगणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय.
Asia Cup 2023 Schedule: 31 ऑगस्टपासून एशिया कपची ( Asia Cup 2023 ) सुरुवात होणार आहे. पाकिस्तानद्वारे याचं आयोजन केलं जाणार असून हायब्रिड मॉडलद्वारे ( Hybrid Model ) हा कप खेळवण्यात येणार आहे. दरम्यान आशिया कपच्या सुरुवातीला पाकिस्तान ( Pakistan Team ) देशात सामने खेळवले जाणार आहेत. तर उर्वरित सामने हे श्रीलंकेमध्ये होणार असल्याची माहिती आहे. अशातच टूर्नामेंटसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आलीये.
आशिया क्रिकेट काऊंसिल ( Asian Cricket Council ) जागा ठरवण्याबाबत पाकिस्तान आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड यांच्यात चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांमध्ये आशिया कपच्या ( Asia Cup 2023 ) शेड्यूल जाहीर करण्यात येईल.
कोणत्या मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तान सामना?
बीसीसीआय ( BCCI ) अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला दिलेल्या माहितीनुसार, शेवटच्या क्षणी काही मुद्द्यांबाबत निर्णय घेणं बाकी आहे. यावेळी ड्राफ्ट शेड्यूल काही सदस्यांना पाठवण्यात आलं आहे. या आठवड्यापर्यंत वेळापत्रक जाहीर केलं जाण्याची आशा आहे. पावसाळ्यामुळे कोलंबोमध्ये सामना घेण्याबाबत समस्या आहे. आम्हाला कोलंबोमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची अपेक्षा होती.
दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दांबुला याठिकाणी होण्याची शक्यता आहे. भारत 6 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध आपल्या आशिया कपला सुरुवात करण्याची शक्यता आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेने ( Asian Cricket Council 2023 ) आशिया कपसाठी हायब्रिड मॉडेल ( Hybrid Model ) खेळवण्याचा विचार केला आहे. कॉन्टिनेन्टल चॅम्पियनशिप दोन देशांमध्ये म्हणजे पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांमध्ये होणार आहे. जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ACC बैठकीत हायब्रीड मॉडेलला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, आशिया कप 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
आशिया कपमध्ये स्पर्धेसाठी 2 गट तयार करण्यात आले आहे. यामधील एका गटात भारत ( Team India ) , नेपाळ आणि पाकिस्तानचा समावेश आहे. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा दुसऱ्या गटात समावेश असणार आहे. भारत ( Team India ) आणि पाकिस्तान ( Pakistan ) या टीम्ससह एकूण 6 टीम्समध्ये 13 सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेची फायनल श्रीलंकेच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.