Rohit Sharma: टीम इंडिया सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. टी-20 सिरीजनंतर आता टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात येतेय. दरम्यान टीम इंडियाचा नवा कोच गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील ही पहिली वनडे सिरीज आहे. या सिरीजमधील दुसरा वनडे सामना रविवारी खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजी केली. 8 वर्षात रोहितने वनडे सामन्यात गोलंदाजी करण्याची ही दुसरी वेळ होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना खेळवण्यात येतोय. श्रीलंकेच्या टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या टीमने निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून 240 रन्स केले. त्याच्याकडून कामिंडू मेंडिसने सर्वाधिक 40 रन्स केले. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतले. यावेळी कुलदीपने कुलदीप यादवनेही 2 विकेट्स घेतले.


रोहित शर्मने दुसऱ्या वनडेमध्ये केली गोलंदाजी


या सामन्यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे या सामन्यात रोहित शर्माने गोलंदाजी केली. रोहितने यावेळी 2 ओव्हर्स टाकले आणि 11 रन्स दिले. या दोन ओव्हर्समध्ये एकही फोर लागला नाही. याशिवाय रोहितला एकही विकेट घेता आली नाही. 8 वर्षांत रोहित शर्माला वनडे सामन्यात गोलंदाजी करताना दिसण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी त्याने 2023 च्या वर्ल्डकपमध्ये स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्ध 5 बॉल फेकले होते. यावेळी त्याने एक विकेटही घेतली होती. 2023 च्या वर्ल्डकपपूर्वी त्याने 2016 मध्ये गोलंदाजी केली होती.


मी केवळ फलंदाजीवर फोकस करणार- रोहित


रोहित शर्माची गोलंदाजीही महत्त्वाची आहे. दरम्यान पहिल्या वनडे सामन्यापूर्वी रोहित शर्माला स्पष्टपणे विचारण्यात आलं होतं की, तो गोलंदाजी करणार का? टी-20 सिरीजमधील शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांनी गोलंदाजी केल्याचं रोहितलं सांगण्यात आलं. तेव्हा त्याच धर्तीवर गोलंदाजी करणाल का? यावर रोहित शर्मा म्हणाला, 'नाही. माझ्या टीममध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे गरज पडल्यास गोलंदाजी करू शकतात. मी फलंदाजीवर लक्ष केंद्रित करेन.


दरम्यान फलंदाजीवर फोकस करणाऱ्या रोहित शर्माने दुसऱ्या वनडे सामन्यात गोलंदाजीचा निर्णय का घेतला हा प्रश्न आता उपस्थित होतोय. गौतम गंभीर जेव्हापासून टीम इंडियाचा कोच बनला आहे, तेव्हापासून स्पेशालिस्ट बॅट्समन देखील गोलंदाजी करतायत. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सिरीजमध्ये रियान पराग, सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांनी गोलंदाजी केली. त्याचप्रमाणे वनडे सिरीजमध्ये पहिल्या सामन्यात शुभमन गिलने गोलंदाजी केली होती.