नवी दिल्ली : दिल्ली हायकोर्टाने याप्रकरणात धोनीला नोटीस बजावली असून याप्रकरणी आता १३ सप्टेंबररोजी पुढील सुनावणी होणार आहे.  महेंद्रसिंह धोनीला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या उत्पादनांची जाहिरात करणे  महागात पडले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिम आणि फिटनेसशी संबंधीत उत्पादनांच्या जाहिराती धोनी फक्त त्यांच्याच कंपनीसाठी करु शकतो. पण धोनीने नियमांचे उल्लंघन करत स्पोर्ट्सफिट कंपनीची प्रतिस्पर्धी कंपनी. म्हणजेच फिट-७ साठी जाहिरात केल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.


फिट ७ आणि स्पोर्ट्सफिट या दोन्ही ब्रँडच्या जाहिराती माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी करतो. स्पोर्ट्स वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ३३ टक्के शेअर्सचे मालक असलेल्या विकास अरोरा यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 


हायकोर्टात झालेल्या सुनावणीत न्यायमूर्तींनी धोनीला नोटीला नोटीस बजावत भूमिका मांडण्याचे आदेश दिले. याशिवाय फिट-७ आणि एसडब्ल्यूपीएलच्या संचालक मंडळालाही हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. 


कंपनीत धोनीने २२ कोटी रुपये गुंतवले असून गुंतवलेली रक्कम परत मिळाल्यावर धोनीने कंपनीतून बाहेर पडण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत सध्या प्रक्रिया सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.


एसडब्ल्यूपीएलने मात्र ही याचिका चुकीच्या उद्देशाने दाखल करण्यात आल्याचा दावा केला आहे. नियमांचे उल्लंघन होत असले तरी संचालकांनी धोनीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला नाही.