Australian Open Novak Djokovic Mother : नोव्हाक जोकोविच आणि रशियाचा स्टार खेळाडू रूब्लेव्ह यांच्या झालेल्या सामन्यात जोकोविचने शानदार कामगिरी करत  रूब्लेव्हचा पराभव केला. जोकोविचने हा सामना  6-1, 6-2, 6-4 असा फरकाने जिंकला आहे. त्याचबरोबर त्याने ऑस्ट्रेलिया ओपनची सेमी फायनल गाठली. त्यावेळचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. (Novak Djokovic sings happy birthday to his mother after reaching Australian Open semifinal Marathi Sports News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रूब्लेव्हचा पराभव केल्यानंतर जोकोविच माध्यमांसमोर बोलण्यासाठी आला. त्यावेळी बोलताना जोकोविच म्हणाला... मला आज काही सांगायचंय. आज माझ्या फिजिओथेरपिस्टचा वाढदिवस आहे. तो सध्या इथं नाहीये. असं म्हणत त्याने त्याच्या फिजिओथेरपिस्ट शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी त्याने आईच्या वाढदिवसाची आठवण देखील करून दिली.


आणखी वाचा - Indonesian Open: लक्ष्य सेनची दमदार सुरुवात; सायना नेहवालचीही विजयी घौडदौड सुरुच


काल माझ्या आईचा देखील (Novak Djokovic Mother Birthday) वाढदिवस होता. माझी आई इथं आली आहे. लव्ह यू आई (I love You MOM), म्हणत त्याने लव सिम्बॉल सर्वांसमोर दाखवलं आणि हॅपी बर्थडे हे गाणे देखील गुणगुणलं. त्यावेळी प्रेक्षकांनी देखील त्याला साथ देत गाणं म्हटलं आणि टाळ्या वाजवल्या.


पाहा Video - 



दरम्यान, सेमी फायनलमधील (Australian Open Semifinal) विजयामुळे जोकोविचने 44 व्या ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत प्रवेश केल. त्याचबरोबर त्याने आपल्या 22व्या विजेतेपदाचा पाठलाग सुरू ठेवला. रविवारच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी त्याचा सामना आता टॉमी पॉलशी होणार आहे.