विराट कोहली याचे कसोटी कर्णधारपद धोक्यात, लवकरच या खेळाडूकडे टीम इंडियाची कमान !
Cricket News : टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली (Test captain Virat Kohli) याच्या पदाला धोका निर्माण झाला आहे.
मुंबई : Cricket News : टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली (Test captain Virat Kohli) याच्या पदाला धोका निर्माण झाला आहे. त्याचा वाईट काळ सुरु झाल्याची चिन्हे दिसून येत आहे. एकीकडे विराट याला गेली दोन वर्षे चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याला शतकी खेळ करण्यात अपयश आले आहे, तर आता दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्नही भंगले आहे. बीसीसीआयने याआधीच विराट याला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवले होते, तर त्याने स्वतः टी-20 चे कर्णधारपद सोडले होते. या मालिकेतील पराभवानंतर विराट याच्या कसोटी कर्णधारपदाला मोठा धोका निर्माण झाला आहे. निवडकर्ते विराटऐवजी दुसऱ्या खेळाडूकडे कर्णधारपद सोपवू शकतात.
या खेळाडूला नवा कर्णधार बनवण्याची संधी
दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहली याचे कसोटी कर्णधारपदही धोक्यात आले आहे, यात शंका नाही. या पदाचा सर्वात मोठा दावेदार रोहित शर्मा असू शकतो. पण बीसीसीआयला प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार हवा आहे आणि अशा परिस्थितीत विराट याच्या जागी 29 वर्षीय के. एल. राहुल याला पुढचा कर्णधार बनवता येईल का, याची चाचपणी करत आहे. राहुल याने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले. राहुल अडचणींना घाबरत नाही आणि त्याचवेळी कर्णधारपदाचा त्याच्या फलंदाजीवर परिणाम होत नाही, असे दिसून आले आहे.
बीसीसीआयची राहुल या प्राधान्य
विराट कोहली याच्या अनुपस्थितीत केएल राहुल याने ज्या प्रकारे कर्णधारपदाटी जबाबदारी पार पाडली, त्यामुळे त्याने सर्वांची मनं जिंकली. त्याचवेळी रोहित एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयने के. एल राहुलकडे कर्णधारपद सोपवले आणि कर्णधारपदासाठी तोही सर्वांच्या मनात असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे, रोहित याला कसोटी संघाचा कर्णधार बनवणे धोक्याचे ठरु शकते. कारण रोहितचे वय सध्या 34 वर्षे आहे. या वयापर्यंत, बहुतेक खेळाडू खेळातून निवृत्त होण्याची निर्णय घेतात. अशा स्थितीत रोहितला जास्त काळ कर्णधारपद सांभाळता येणार नाही आणि बोर्ड त्याच्याकडे ते सोपवण्याचा धोका पत्करु इच्छित नाही. त्याचवेळी, बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे की आता त्यांना इतर बोर्डांप्रमाणे वेगळ्या फॉरमॅटचा वेगळा कर्णधार हवा आहे.
विराट याला वनडे कर्णधारपदावरुन हटवण्यात आले
बीसीसीआयने विराट कोहलीला याआधीच वनडे कर्णधारपदावरून हटवले आहे. या निर्णयानंतर विराट कोहली आणि बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली यांच्यात अनेकदा वाद झाला आहे. बीसीसीआय आणि विराट यांच्यातील प्रदीर्घ वादातून एक स्पष्ट झाले की ते त्याच्यावर खूश नाही. अशा परिस्थितीत विराटकडून कसोटी कर्णधारपद हिरावून घेण्याची सुवर्णसंधी बीसीसीआयला मिळाली आहे.