ऑस्ट्रेलियाला चढली विजयाची झिंग...ग्लास ऐवजी शूजमध्ये ओतली बिअर आणि... व्हिडीओ
T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बूट काढले, बिअर ओतली आणि त्यातून बिअर प्यायले... विश्वास बसत नाही तर हा व्हिडीओ पाहाच
दुबई: न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाची झिंग ऑस्ट्रेलिय़ाच्या खेळाडूंना चढल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे मैदानात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अत्यंत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे ड्रेसिंग रूममध्ये आल्यानंतर खेळाडूंनी आनंदाच्या भरात जे केलं ते पाहून तर अनेकांना धक्काच बसला.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आपले शूट उतरवले. या शूजमध्ये बीअर ओतली आणि शूजमधून बीअर प्यायले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आयसीसीने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
आईसीसीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टोइनिस याने शूजमध्ये बिअर ओतून ती प्यायल्याचे दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एक प्रश्न असाही नेटकऱ्य़ांना पडलाय की असं सेलिब्रेशन कोण करतं?
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2021 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत ऑस्ट्रेलिया विश्व विजेता ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले होते.
ऑस्ट्रेलियाने हे विजयी आव्हान 18.5 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मिचेल मार्श आणि आणि डेव्हीड वॉर्नर हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे हिरो ठरले. मिचेल मार्शने नाबाद 77 धावा केल्या. तर डेव्हिड वॉर्नरने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टने 2 विकेट्स घेतल्या.