दुबई: ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना जेरीस आणलं. ऑस्ट्रेलिया संघाने 8 विकेट्सने न्यूझीलंड संघावर विजय मिळवला आहे. T20 World cup ची ट्रॉफी आपल्या नावावर ऑस्ट्रेलिया संघाने केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात एक मजेशीर किस्सा घडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही हैराण झाले. किवी संघाची फलंदाजी सुरू होती. त्यावेळी  डेरेल मिशेलने मॅक्सवेलच्या पहिल्याच बॉलवर लांब षटकार ठोकला. 


हा षटकार एवढा लांब ठोकला की तो थेट चाहते बसले होते तिथेच जाऊन पडला. एका फॅनने हा कॅच पकडला नाही म्हणून दुसरा संतापला. तो निराश झाला आणि त्याने बॉल उचलला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 


हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांना आपलं हसू आवरलं नाही. कॅच न पकडल्याने फॅन निराश झाला त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2021 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत ऑस्ट्रेलिया विश्व विजेता ठरला. 


ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलियाने हे विजयी आव्हान 18.5 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ICC (@icc)