मुंबई: नुकताच पायाने रनआऊट करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यापाठोपाठ आता आणखी एक कॅच आऊट करतानाचा खेळाडूचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. वाऱ्याच्या वेगानं धावत सुपरमॅन सारखी या खेळाडूनं एका हाताने कॅच पकडली आहे. एक सेकंद विश्वास बसणार नाही पण असा सुपरकॅच तुम्ही मिस केला असेल जर नक्की हा व्हिडीओ पाहायला चुकवू नका. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने वेलिंग्टन येथे बांगलादेश विरुद्धच्या तिसर्‍या वनडे सामन्यात फलंदाजाला असं कॅच आऊट केलं ते पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. 



ट्रेंट बोल्टने बांगलादेशचा सलामीवीर फलंदाज लिटन दासनं टोलवलेला चेंडू षटकार पडण्यासाठी जात असतानाच वाऱ्याच्या वेगानं धावत ट्रेंटनं हा चेंडू हवेत उंच उडी मारून एका हातानं पकडला.


ICCने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आपल्या ट्वीटरवर शेअर केला आहे. लिटन दासला अवघ्या 21 धावा काढून तंबूत परतावं लागलं. बोल्टनं त्याला कॅच आऊट केलं आणि दासच्या तुफान फलंदाजीला सामन्यात ब्रेक लागला. न्यूझीलंड संघानं 164 धावांनी बांग्लादेशवर विजय मिळवत मालिका 3-0ने खिशात घातली.