मॅचमध्ये पराभव झाला तरी न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक
तीन देशांच्या टी-२० सीरिजमधील शेवटच्या मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा अवघ्या २ रन्सने पराभव केला. मात्र, असं असलं तरी न्यूझीलंडची टीम फायनलमध्ये दाखल झाली आहे.
नवी दिल्ली : तीन देशांच्या टी-२० सीरिजमधील शेवटच्या मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा अवघ्या २ रन्सने पराभव केला. मात्र, असं असलं तरी न्यूझीलंडची टीम फायनलमध्ये दाखल झाली आहे.
पराभव झाला असला तरी रन रेटच्या आधारावर न्यूझीलंडच्या टीमने फायनलमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. फायनल मॅचमध्ये न्यूझीलंडच्या टीमला ऑस्ट्रेलियाच्या टीमचा सामना करावा लागणार आहे.
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या मॅचमध्ये इंग्लंडकडून इयॉन मॉर्गने शानदार ८० रन्सची इनिंग खेळली त्यामुळे इंग्लंडच्या टीमने २० ओव्हर्समध्ये १९४ रन्स पर्यंत मजल मारली.
...आणि इंग्लंडने मॅच जिंकली
यानंतर मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या टीमने चांगली सुरुवात केली. मात्र, २० ओव्हर्समध्ये त्यांना १९२ रन्सपर्यंतच मजल मारता आली आणि त्यामुळे इंग्लंडने ही मॅच २ रन्सने जिंकली.
...तर इंग्लंडने फायलन गाठली असती
न्यूझीलंडच्या टीमला १७५ रन्सवर रोखलं असतं तर इंग्लंडची टीम फायनलमध्ये पोहोचली असती. मात्र, तसं झालं नाही. न्यूझीलंडच्या टीमने २० ओव्हर्समध्ये ४ विकेट्स गमावत १९२ रन्स केले आणि फायनलमध्ये धडक मारली आहे.
मुनरोची आणखीन एक तुफानी खेळी
न्यूझीलंडच्या टीमकडून कॉलिन मुनरोने तुफानी फटकेबाजी करत १८ बॉल्समध्ये ५० रन्स केले.