मुंबई : महिला क्रिकेट टीम इंडियाने पाचव्या वनडेत न्यूझीलंडवर (New Zealand Women vs India Women) 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. टीम इंडियाला पहिल्या चार सामन्यात सपाटून पराभवाचा सामना करावा लागला.  मात्र अखेर टीम इंडियाने पाचव्या सामन्यात विजय मिळवत शेवट गोड केला. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं 252 धावांचं आव्हान टीम इंडियाने 46 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. (nzw vs indw 5th odi captain mithali raj become successfull indian cricketer who run chaseing with highest average and break ms dhoni record)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाकडून स्मृती मंधानाने 71 धावांची सर्वाधिक खेळी केली. तर हरमनप्रीत कौरने 63 धावा केल्या. तर कॅप्टन मिताली राजने (Mithali Raj) 57 धावांचं योगदान दिलं. या खेळीसह मितालीने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) रेकॉर्ड ब्रेक केला आहे.


नक्की काय रेकॉर्ड काय? 


मिताली राज विजयी लक्षाचं पाठलाग करताना सर्वोत्तम सरासरीने धावा करणारी भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. मितालीने वनडेमध्ये विजयी धावांचा पाठलाग करताना 109.05 च्या सरासरीने 2 हजार 181 धावा केल्या आहेत. 


टीम इंडियाने विजयी आव्हानचं पाठलाग करताना मिळवलेल्या विजयात धोनीने 102.71 च्या सरासरीने 2 हजार 876 धावा केल्या आहेत. मात्र आता सर्वोत्तम सरासरीबाबत मितालीने धोनीला मागे टाकलं आहे. याबाबतीत विराट कोहलीने 94.66 च्या एव्हरेजने 5 हजार 396 धावा चोपल्या आहेत. 


स्मृती मंधानाही रन चेज करण्यात माहिर आहे. स्मृती मंधानाने 69.94 च्या सरासरीने 1 हजार 189 रन्स काढल्या आहेत. तर सुरेश रैना 66.60 च्या सरासरीने 1 हजार 865 रन्स केल्या आहेत.