Mohammed Siraj : मोहम्मद सिराज ठरला पॉवरप्लेचा `बादशाह`, आकडे पाहून डोळे गरगरतील
IND vs AUS : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) गेल्या 4 वर्षात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक खतरनाक गोलंदाज ठरला आहे.
Mohammed Siraj Record & Stats : गोलंदाजी करताना पहिल्या काही ओव्हरमध्ये विकेट मिळाली की संघाचा विजय सोपा होतो. त्यामुळे टीमच्या फास्टरवर संघाच्या विजयाचं ओझं असतं. टीम इंडियासाठी (Indian Cricket Team) बुमराहने ही भूमिका योग्यरित्या पार पाडली होती. मात्र, बुमराह संघात नसताना टीम इंजियाचा तारणहार ठरला मोहम्मद सिराज... मागील वनडे वर्ल्ड कपनंतर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाज म्हणून समोर आला आहे. विशेषत: पॉवरप्ले ओव्हर्समध्ये मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजीने छाप पाडली आहे. 2019 नंतर, मोहम्मद सिराजने पॉवरप्ले (Powerplay) ओव्हर्समध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. विश्वचषक 2019 पासून मोहम्मद सिराजने पॉवरप्ले ओव्हर्समध्ये 32 खेळाडूंची विकेट नावावर केलीये. त्यामुळे सिराजच्या नावाची दहशत वर्ल्ड कपमध्ये सर्व संघांनी घेतल्याचं पहायला मिळतंय.
सिराजला टीम इंडियामध्ये संधी मिळत गेली अन् मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj Dominance) संधीचं सोनं केलं. त्याने पॉवरप्ले ओव्हर्समध्ये 32 विकेट्स घेतल्या. तर त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याचा नंबर लागतो. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने वर्ल्ड कप 2019 पासून पॉवरप्ले ओव्हर्समध्ये 25 विकेट घेतल्या आहेत. तर न्यूझीलंडचा मॅट हेन्री याने 2019 नंतर 23 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याचा नंबर लागतो. त्याने पॉवरप्लेमध्ये 19 गड्यांना बाद केलंय.
दरम्यान, मोहम्मद सिराजने आतापर्यंत 31 वनडे सामने खेळले आहेत. या 31 एकदिवसीय सामन्यांमध्ये मोहम्मद सिराजने 20.35 च्या स्ट्राइक रेटने आणि 4.86 च्या इकॉनॉमीने 54 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर डेथ ओव्हरमध्ये देखील तो घातक दिसत आहे. आशिया कपच्या फायनलमध्ये सिराजने श्रीलंकाचा खात्मा केला होता. मात्र, वनडेमध्ये देखील कसोटीप्रमाणे अचूक लाईन लेंथमध्ये गोलंदाजी करताना दिसतो.