Ravindra jadeja bold Steven Smith : वर्ल्ड कपचा पाचवा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात खेळवला जातोय. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स याने टॉस जिंकला आणि पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात सावध सुरूवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची कंबर मोडली ती रविंद्र जडेजाने (Ravindra jadeja). पीचची परिस्थिती पाहता कॅप्टन रोहित शर्माने आजच्या सामन्यात तीन प्रमुख फिरकीपटूंचा समावेश केला. त्याचा फायदा टीम इंडियाला झाल्याचं पहायला मिळालं. रविंद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या सुरूवातीच्या तीन खेळाडूंनी तंबूत पाठवलं. त्यात स्टिवन स्मिथची (Steven Smith) विकेट खास ठरली.
ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मिचेल मार्श ही सलामी जोडी मैदानात आली. ऑस्ट्रेलियाच्या या सलामी जोडीने पहिल्या 2 ओव्हरपर्यंत सावध सुरुवात केली. त्यानंतर बुमराहने मार्शला तंबूत पाठवलं. त्यानंतर वॉर्नर आणि स्मिथने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. हळूहळू ऑस्ट्रेलियाचा संघ धावगती वाढवत होता. त्यामुळे रोहित शर्माने जडेजाला (Ravindra Jadeja) पुन्हा गोलंदाजीला आणलं अन् भारताला विकेट मिळाली.
28 व्या ओव्हरपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या फक्त 2 विकेट गेल्या होत्या. 28 वी ओव्हर जडेजाच्या हातात आली. त्याने पहिल्याच बॉलवर स्टिवन स्मिथचा कार्यक्रम केला. टप्प्यात गोलंदाजी करताना जडेजाने पहिल्या स्टंप्सच्या बेल्स उडवल्या. त्याचा व्हिडीओ (Viral Video) देखील आता समोर आला आहे. जडेजाने स्मिथच्या विकेटपासून 9 चेंडू टाकत फक्त 3 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. जडेजाने 3 विकेट घेतल्यानंतर 30 षटकात ऑस्ट्रेलिया संघाच्या एकूण 5 विकेट्स पडल्या.
Jadeja owns Smith in every universe!! #IndvsAuspic.twitter.com/uuK3l67sKv
— (@thegoat_msd_) October 8, 2023
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.