Pakistan Cricketer Racist Comments: टी 20 वर्ल्डकप स्पर्धा रंगात आली असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वसीम अकरमने (Wasim Akaram) लाईव्ह शोमध्ये मस्करीत विंडीज खेळाडूवर आक्षेपार्ह विधान केलं. यानंतर सोशल मीडियावर वसीम अकरम विरोधात रान पेटलं आहे. यावेळी डिबेट शोमध्ये माजी क्रिकेटपटू वकार युनूसही (Waqar Yunis) होता. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू आणि कर्णधार निकोलस पूरनविरोधात (Nicholos Pooran) आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर हे वक्तव्य वर्णभेदी टीका असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर (Social Media) रंगली आहे. सोशल मीडियावर वसीम अकरमचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत वसीम अकरम वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू निकोलस पूरनची थट्टा मस्करी करत आहे. वसीम अकरमनं सांगितलं की, 'मला तो पूरन काही दिसत नाही, मग त्याचं नाव कसं दिसणार.' यावेळी वकार युनिस डिबेट शोमध्ये उपस्थित होता. मात्र त्याने याबाबत चकार शब्द काढला नाही. 



स्कॉटलँडच्या खेळाडूवर अशी टीका केली होती


मिसबाह-उल-हक, वसीम अकरम, वकार युनूस आणि शोएब मलिक हे चौघं पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीवर डिबेटसाठी बसले होते. यावेळी वसीम अकरमने स्कॉटिश खेळाडूची खिल्ली उडवली. मार्क वॅटचा हातात कागद असलेला फोटो नुकताच व्हायरल झाला होता. वसीम अकरम म्हणाला, 'त्याच्या आईने त्याला एक किलो बर्फ, तीन लिंबू आणायला सांगितले होते. हे डकवर्थ लुईस नाही.' मध्येच त्याला थांबवत मिसबाह-उल-हक म्हणाला की, कोणत्या फलंदाजासमोर कोणता चेंडू टाकायचा हे लिहिलेले आहे. वसीम अकरम प्रत्युत्तरात म्हणाला की, गोलंदाज म्हणून मला कोणत्याही स्लिपची गरज नाही. यादरम्यान वकारने बोलला की, कदाचित त्याला स्मृतीभ्रंश आहे.



टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 12 फेरीत भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 23 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे. त्यामुळे गेल्या वर्ल्डकपमधील पराभवाचा वचपा रोहित सेना काढणार की, बाबर सेना विजयी कित्ता गिरवणार? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.