IPL मध्ये संधी देऊ सांगत खेळाडूंना लाखोंचा गंडा, अनेक मोठी नावं पुढे येण्याची शक्यता
पैसे घेऊन त्यांना राज्यात किंवा आयपीएल संघात संधी देण्यासाठी आमिष
मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा घोटाळ्याची बातमी येत आहेत. खेळाडूंकडून पैसे घेऊन त्यांना राज्यात किंवा आयपीएल संघात संधी देण्यासाठी आमिष दिले जात आहे. या घोटाळ्यात अटक झालेले प्रशिक्षक कुलबीर रावत यांनी आपण आठ ते नऊ खेळाडूंकडून पैसे घेतल्याची कबुली दिली. चौकशीदरम्यान रावत यांनी सिक्कीम क्रिकेट असोसिएशनचे निवडकर्ता विकास प्रधान यांचेही नाव घेतले आहे.
ज्यांचे घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप आहे. गुरूग्राम पोलीस लवकरच त्याला तपासात सामील होण्यासाठी नोटीस देतील. दरम्यान, आशुतोष बोरा आणि कुलबीर रावत यांच्यातील चॅट रेकॉर्डने असेही सूचित केले की राज्य स्तरीय क्रिकेट संघटनांशी संबंधित काही मोठी नावेही या घोटाळ्यात सामील आहेत.
'द ट्रिब्यून' च्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, चॅटमध्ये यूपी क्रिकेट असोसिएशनचे निवडक अकरम खान, उपाध्यक्ष माहिम वर्मा आणि उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनचे सीईओ अमन यांचा उल्लेख आहे. पोलिसांनी सांगितले की, चॅटमध्ये रावत यांनी असेही सूचित केले की, त्यांनी यूपी आणि उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनद्वारे अनेक वेळा उमेदवारांची निवड केली आहे. तपासात सामील होण्यासाठी चॅटमध्ये नमूद केलेल्या नावांना पोलीस नोटीस बजावणार आहे.
आशुतोष बोरा यांच्या फर्मच्या खात्यातून रावत यांच्या खात्यात 35 लाखांहून अधिक रक्कम वर्ग करण्यात आली. बोरा यांच्या खात्यातून 2 लाखांहून अधिक रुपये सिक्कीम क्रिकेट असोसिएशनचे निवडक विकास प्रधान यांना हस्तांतरित करण्यात आले. याशिवाय अरुणाचल क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष नबाम विवेकही तपासात सामील होतील.
4 सप्टेंबर रोजी गुरूग्राम पोलिसांनी एका टोळीचा भांडाफोड केला होता जो तरुण क्रिकेटपटूंची लाखो रुपयांची फसवणूक करत होता आणि त्यांना विविध संघ आणि स्पर्धांमध्ये निवड करण्याचे आश्वासन देत होता. क्रीडा व्यवस्थापन कंपनी सिक्योर कॉर्पोरेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (SCM) चे संचालक असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर इतर तीन आरोपी अद्याप फरार आहेत.