Shoaib Akhtar: पाकिस्तान क्रिकेट म्हणजे फास्ट बॉलर्सची खाण, असं म्हटलं जातं. इम्रान खान, वसीम अक्रम, वकार युनुस यांसारख्या बड्या खेळाडूंच्या यादीत शोएब अख्तर (Shoaib Akhtar) देखील सामील झाला. शरीराने धिप्पाड आणि लांब लचक केसं मोकळी सोडलेला शोएब अख्तर जेव्हा धावत बॉलिंगला येयचा, तेव्हा भलेभले फलंदाजांच्या कंबाळ्या मोकळ्या होयच्या. शोएब अख्तरने क्रिकेटच्या इतिहास भरपूर नाव गाजवलं. आजही पाकिस्तानचा संघ बॉलिंगसाठीच ओळखला जातो. अशातच आता पाकिस्तानमध्ये एक 100 वर्षांचा गोलंदाज (Old Man Bowling) खास चर्चेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट खेळणं सोडल्यापासून शोएब अख्तर सोशल मीडियावर (Shoaib Akhtar Video) अनेकदा अॅक्टिव दिसतो. अनेक व्हिडिओ तो शेअर (Social Media) करताना दिसतो. तर अनेकदा त्याच्या वक्तव्यामुळे वाद देखील निर्माण झाला आहे. अनेक गोलंदाज घडवण्यात देखील शोएबचा हात आहे. अशातच एका वृद्ध व्यक्तीच्या गोलंदाजीच्या व्हिडिओने (Old Man Bowling Video) खुद्द शोएब अख्तरलाही आश्चर्यचकित केल्याचं पहायला मिळतंय.


आणखी वाचा - Virat Kohli Daughter : लाडक्या लेकीसह विराटने शेअर केला 'तो' फोटो, म्हणाला...


शोएबने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात एक वृद्ध व्यक्ती बॉलिंग करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा वृद्ध व्यक्ती अगदी शोएब अख्तरसारखाच धावत येतो आणि शोएब ज्या स्टाईलने बॉल फेकायचा त्याच स्टाइलमध्ये बॉल फेकतो. त्यावर शोएबने आश्चर्य व्यक्त केलंय. अरे व्वा 100 MPH तेही 100 व्या वयात, मला त्याला भेटायला आवडेल. कोणीतरी शोधा आणि आणा, असं शोएब म्हणाला आहे.


पाहा VIDEO -



दरम्यान, केपटाऊन येथे खेळला गेलेला इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामना सर्वांच्याच लक्षात असेल. ICC ODI विश्वचषक 2003 मध्ये शोएब अख्तरने सर्वात वेगवान चेंडू 161.4 किमी प्रतितास वेगाने बॉल टाकत विक्रम नावावर केला. या विक्रमाला अद्याप कोणालाही छेद देता आला नाही. भारताकडून उमरान मलिक हा विक्रम मोडेल, अशी अपेक्षा शोएबला देखील आहे.