भुवनेश्वर : सुशील कुमारपाठोपाठ आता आणखी एक खेळाडू अडचणीत सापडला आहे. ऑलिंपिक विजेत्या खेळाडूवर मित्राच्या हत्येचा गंभीर आरोप आहे. ऑलिंपिक विजेत्या हॉकी खेळाडू विरेंद्र लाकडा असं या खेळाडूचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरेंद्रने मित्र आनंद टप्पोची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आनंदच्या वडिलांनी एक तरुणी आणि विरेंद्रवर गंभीर आरोप केले आहेत. मुलाच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं आहे. हे सर्व ओडिसाच्या सुंदरगड परिसरातील रहिवासी आहेत.


आनंद टप्पोचा मृतदेह 28 फेब्रुवारी रोजी इंफोसिटी ठाणे क्षेत्र भुवनेश्वर परिसरात आढळला होता. पोलिसांना आनंदची हत्या झाल्याचा संशय आहे. तर त्याच्या वडिलांनी केलेल्या आरोपामुळे आता हा संशय अधिक दृढ झाला आहे. 


आनंदचं 16 फेब्रुवारीला लग्न झालं होतं. तर 18 तारीखला रिसेप्शन ठेवण्यात आलं होतं. त्यामध्ये विरेंद्र देखील सहभागी झाला होता. 28 फेब्रुवारीला आनंद भुवनेश्वरला गेला होता. तिथे एक तरुणी आणि तरुण होता. तो तरुण विरेंद्रच असणार असा वडिलांनी दावा केला आहे. 


आरोपींपैकी कोणीही अजून समोर आलं नाही. या प्रकरणी पोलीसही आनंदच्या कुटुंबाला अपेक्षित ती मदत करत नाही. पोलिसानी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी अजून तपास सुरू आहे.