Haryana Government Big Decision About Vinesh Phogat: पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेमध्ये भारताचं सुवर्ण स्वप्न बुधवारी भंगलं जेव्हा कुस्तीच्या 50 किलो वजनी गटामध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचलेल्या विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलं. अवघं 100 ग्रॅम वजन अधिक भरल्याने विनेशला अंतिम सामना खेळू देण्यात आला नाही. माजी वर्ल्ड चॅम्पिनबरोबरच अनेक नामांकित महिला कुस्तीपटूंना धूळ चारत अंतिम फेरीत पोहोचलेली विनेश नक्कीच सुवर्णपदक घेऊन येईल असा विश्वास व्यक्त केला जात असतानाच वजनाने तिचा आणि भारताचा घात केला.


अनेकांनी दिला तिला धीर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनेश फोगाट अशी अगदीच अनपेक्षितपणे ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्यानंतर देशातील नेत्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटींनीही तिला पाठिंबा देत खचून न जाण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते विरोधी पक्ष नेते राहुल गांधींपर्यंत अनेकांनी विनेशला धीर देत आम्हाला तुझा अभिमान असल्याचं सांगितलं. मात्र आता या पुढे जात विनेशच्या गृहराज्याने म्हणजेच हरिणाया सरकारने विनेशनसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला असून मुख्यमंत्र्यांनीच त्याची घोषणा केली आहे.


नक्की वाचा >> ऑलिम्पिकमध्ये चाललंय तरी काय? 'आताच्या आता पॅरीस सोडायचं'; भारतीय खेळाडूला आदेश


आमच्यासाठी तू चॅम्पियनच


हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी राज्य सरकारच्या एका निर्णयाबद्दलची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. नायब सिंग सैनी यांनी, "हरियाणाची आमची शूर मुलगी विनेश फोगाटने जबदस्त कामगिरी करत तिने फायनलमध्ये प्रवेश केला होता. कोणत्याही कारणाने तिला ऑलिम्पिकमध्ये अंतीम सामना खेळता आला नसला तरी आमच्यासाठी ती विजेतीच आहे," असं म्हणत विनेशसंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. 


या गोष्टी विनेशला अगदी कृतज्ञतेनं दिल्या जातील


"आमच्या सरकारने असा निर्णय घेतला आहे की विनेश फोगाटचं एखाद्या पदकविजेत्याप्रमाणेच स्वागत केलं जाईल. तिच्या अभिनंदनाचा कार्यक्रमही एखाद्या विजेत्याप्रमाणेच होईल. हरियाणा सरकार ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्यांना जो सन्मान, बक्षीस आणि सेवा देतात त्याच सर्व गोष्टी विनेश फोगाटला अगदी कृतज्ञतेने दिल्या जातील," अशी घोषणा नायब सिंग सैनी यांनी आपल्या अधिकृत एक्स (ट्वीटर) हॅण्डलवरुन केली आहे.  "आम्हाला तुझा फार अभिमान वाटतोय," असंही नायब सिंग सैनी यांनी म्हटलं आहे. पहिल्यांदाच हरिणायामध्ये अशाप्रकारे पदक न जिंकलेल्या खेळाडूला सन्मानित केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हा निर्णय खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे.




नक्की वाचा >> तासाचे 2 कोटी रुपये देतो, फक्त..; गुप्तांगामुळे ऑलिम्पिकबाहेर पडलेल्याला 'तसल्या' कंपनीची जॉब ऑफर


कोणाला किती पैसे मिळतात?


पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा सरकारच्या क्रीडा धोरणानुसार ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला राज्य सरकार 6 कोटी रुपयांचं बक्षीस देतं. तर रौप्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूला 4 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जातं. त्याप्रमाणे कांस्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूला 2.5 कोटी रुपये देण्याचं हरियाणा सरकारचं धोरण आहे.