Rohit Sharma And Hardik Pandya: आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सला चांगला खेळ करता आला नाही. टीमच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्याकडे दिली खरी मात्र टीमला प्लेऑफ गाठता आली नाही. अशा परिस्थितीत टीममध्ये काहीही आलबेल नसल्याच्याही चर्चा रंगला होत्या. कर्णधार बदलल्याचा निर्णय संपूर्ण टीमवर पडल्याचं दिसून आलं. रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सची टीम दोन गटात विभागली गेली असून रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या एकमेकांसोबत प्रॅक्टिस करत नसल्याचं समोर आलं आहे. 


प्रॅक्टिस सेशनमध्ये दोघंही क्वचितच एकत्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार, रोहित आणि हार्दिक आयपीएलच्या संपूर्ण सिझनमध्ये क्वचितच एकत्र प्रॅक्टिस करताना दिसले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव झाल्यानंतर रोहित शर्मा नेटमध्ये फलंदाजी करत होता, मात्र त्यावेळी हार्दिक तिथे उपस्थित नव्हता. यावेळी रोहित हा सूर्या आणि तिलकसोबत बसला असताना हार्दिक नेट्समध्ये प्रॅक्टिस करताना दिसला. यामध्ये असा दावा केला जातोय की, हार्दिकला पाहताच हे तिन्ही खेळाडू जागेवरून उठून निघून गेले. 


मुंबईसोबत रोहित शर्माचा शेवटचा सिझन?


कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्माने विरोधी टीमचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी संभाषण केलं होतं.  या संभाषणात रोहितने हार्दिकच्या कर्णधार बनल्यानंतर मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या बदलांची नोंद केली होती. या सर्व गोष्टींनंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार का, हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. अशातच पुढच्या सिझनमध्ये मेगा लिलाव होणार असून मुंबई इंडियन्स रोहितला कायम ठेवण्याची शक्यता कमी आहे. 


यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्माचा फ्लॉप शो


रोहित शर्माने आयपीएल 2024 मध्ये 13 सामने खेळले असून या 13 सामन्यांमध्ये 145.42 च्या स्ट्राईक रेटने 349 रन्स केल्या आहेत. 13 सामन्यांत त्याने एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. मात्र यावेळी एका शतकाचा समावेश आहे. रोहित शर्माची या सिझनमधील आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद 105 रन्स आहे.