Rohit Sharma: रोहित शर्माची एक चूक आणि...; कर्णधाराच्या `या` चुकीमुळे टीम इंडियाने गमावला वर्ल्डकप?
Rohit Sharma: वर्ल्डकपच्या फायनल सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमने भारतीय चाहत्यांची स्वप्नं धुळीस मिळवली. यावेळी टॉस गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला स्कोअर बोर्डवर केवळ 241 रन्सचं लक्ष्य ठेवता आलं. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्स राखून सहज राखलं.
Rohit Sharma: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवारी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगला होता. फायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टीमने टीम इंडियाचा 6 विकेट्सने पराभव केला. या पराभवाने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने स्पर्धेच्या 10 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. मात्र फायनलमध्ये टीमला पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी कर्णधार रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) एका चुकीमुळे टीम इंडियाला ( Team India ) पराभवाचा सामना करावा लागल्याचं म्हटलं जातंय.
वर्ल्डकपच्या फायनल सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमने भारतीय चाहत्यांची स्वप्नं धुळीस मिळवली. यावेळी टॉस गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला स्कोअर बोर्डवर केवळ 241 रन्सचं लक्ष्य ठेवता आलं. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्स राखून सहज राखलं.
टीम इंडियाचं स्वप्न भंगलं
वर्ल्डकपच्या फायनल सामन्यामध्ये 241 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमची सुरुवात खराब झाली. मोहम्मद शमीने भारताला पहिली विकेट मिळवून दिली. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना मिचेल मार्शही 15 रन्स करून पॅव्हेलियनमध्ये परतला. स्टीव्ह स्मिथ देखीस स्वस्तात माघारी परतला. मात्र ट्रेव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी डाव सांभाळला आणि टीमला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
रोहित शर्माकडून झाली मोठी चूक
फायनलच्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 30 रन्सवर शुभमन गिलची विकेट गमावली होती. यावेळी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहलीने मिळून जबरदस्त खेळ दाखवला. 10व्या ओव्हरमध्ये रोहित शर्माने मॅक्सवेलच्या पहिल्या 2 बॉलमध्ये 10 रन्स केले. त्याने पहिल्या बॉलवर सिक्स आणि दुसऱ्या बॉलवर फोर लगावला.
यानंतर रोहित शर्मा आणखी एक सिक्स मारण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन टीमला टार्गेट केलं आणि इंडियन टीम सामन्यात कमबॅक करू शकली नाही. रोहितची ( Rohit Sharma ) ही चूक भारतासाठी वर्ल्ड चॅम्पियन होण्यात मोठा अडथळा ठरली.