मुंबई : आयपीएल २०१८चा ओपनिंग सेरेमनी एक दिवस पुढे ढकलण्यात आलाय. आता ६ एप्रिल नव्हे तर ७ एप्रिलला आयपीएलचा ओपनिंग सेरेमनी होणार आहे. तसेच ओपनिंग सेरेमनीचे ठिकाणाही बदलण्यात आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवातीला ओपनिंग सेरेमनी क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये होणार होता. मात्र आता हा सोहळा वानखेडेवर होणार आहे. या सोहळ्याचे बजेटही २० कोटी रुपयांनी कमी करण्यात आलेय.


आयपीएलच्या ११व्या सीझनला ७ एप्रिलपासून सुरुवात होतेय. पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि दोन वर्षाच्या बंदीनंतर परतलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात रंगणार आहे. 


आयपीएलमध्ये दोन वेळा जेतेपद जिंकणारा चेन्नई सुपर किंग्ज दोन वर्षांच्या बंदीनंतर पुन्हा खेळण्यासाठी सज्ज झालाय. चेन्नईचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीकडे देण्यात आलेय.


इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, आयपीएलची ओपनिंग सेरेमनी सामना सुरु होण्याआधी होईल. या सोहळ्यासाठीच्या खर्चात कपात करण्याचा निर्णय कमिटी ऑफ अॅडमिनिस्ट्रेटर्सकडून घेण्यात आलाय. याआधी या सोहळ्यासाठी आयपीएल गर्व्हनिंग काऊंसिलने ५० कोटी रुपयांचे बजेट ठेवले होते. मात्र आता ३० कोटींपर्यंत बजेट कमी करण्यात आलेय. आयपीएलच्या बाकी वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही.



ओपनिंग सेरेमनीमध्ये हॉलीवूडचा तडका


आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनी मध्ये यंदा बॉलीवूडपासून ते हॉलीवूडचे स्टार्स सहभागी होणार आहेत. यासाठी अमेरिकेसहित अन्य देशातील कलाकारांशीही याबाबत बातचीत होत असल्याची माहिती आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिली. 


पहिल्यांदा स्टार करणार प्रसारण


स्टारवर यंदा पहिल्यांदाच आयपीएलचे प्रसारण होणार आहे. याआधी या लीगच्या प्रसारणाची जबाबादारी सोनी नेटवर्ककडे होती. पहिला क्वालिफायर आणि फायनल सामना अनुक्रमे २२ आणि २७ मेला वानखेडेवर रंगणार आहे. 


ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्येही होणार प्रसारण


राजीव शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या आयपीएलचे प्रसारण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांतही होणार आहे. तसेच इंग्रजीव्यतिरिक्त चार स्थानिक भाषांमध्येही याचे प्रसारण होणार आहे. इंग्रजीशिवाय हिंदी, बांग्ला, तामिळ आणि तेलुगु या चार भाषांमध्ये आयपीएलचे प्रसारण होणार आहे.