IPL 2021 : ऑरेंज कॅप शिखर धवनकडे; `पर्पल कॅप`च्या रेसमध्ये कोण पुढे?
सध्या आयपीएलची ऑरेंज कॅप ही दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवनने याच्याकडे आहे.
दुबई : आयपीएलचा दुसरा टप्पा सुरु झाला असून फॅन्सना पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार अनुभवता येतोय. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सने 23 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव केला. या विजयासह केकेआरने टॉप - 4 मध्ये स्थान मिळवले आहे. यंदाच्या आयपीएल सिझनच्या 34 व्या सामन्यानंतर, पर्पल आणि ऑरेंज कॅपची शर्यत पाहिली तर टॉप -5 मध्ये कोणताही बदल दिसला नाही.
सध्या आयपीएलची ऑरेंज कॅप ही दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवनने याच्याकडे आहे. शिखर धवनने 9 डावांमध्ये 422 रन्स केले आहेत. सध्या यंदाच्या सीझनमध्ये त्याचे रन्स जास्त असल्याने ऑरेंज कॅपचा ताबा धवनकडे आहे.
फलंदाजांमध्ये केएल राहुल दुसऱ्या स्थानावर आहे. ज्याने 8 डावांमध्ये 380 रन्स केले आहेत. तर मयंक अग्रवाल 327 रन्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. फाफ डु प्लेसिस टॉप 5मधील एकमेव परदेशी फलंदाज आहे. जो 320 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. याशिवाय पृथ्वी शॉ 319 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
422 रन्स – शिखर धवन
380 रन्स – केएल राहुल
327 रन्स – मयंक अग्रवाल
320 रन्स – फाफ डु प्लेसिस
319 रन्स – पृथ्वी शॉ
गोलंदाजांमध्ये हर्षल पटेल 8 सामन्यांत 17 विकेट्स घेतले असून तो अव्वल स्थानावर आहे. सध्या त्याचं नाव पर्पल कॅपवर आहे. तर आवेश खानने 9 सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत आणि तो दुसऱ्या स्थानावर आहे.
याशिवाय ख्रिस मॉरिस 14 विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे, तर अर्शदीप सिंग 12 विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे. टॉप 5 मध्ये रशीद खान हा एकमेव अफगाणिस्तानचा गोलंदाज आहे, ज्याने 8 सामन्यांमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत.
17 विकेट्स – हर्षल पटेल
14 विकेट्स – आवेश खान
14 विकेट्स – क्रिस मॉरिस
12 विकेट्स – अर्शदीप सिंह
11 विकेट्स – राशिद खान