नवी दिल्ली : येणाऱ्या २०१८ च्या स्वागताला सर्व सज्ज झाले आहेत. मागच्या वर्षात केलेल्या चुका टाळत नव्या वर्षात नवे शिकण्याचा सर्वजण संकल्प करत आहे. यामध्ये खेळाडूही कुठे मागे नाहीत. 
 बॅडमिंटनपट्टू पी.व्ही. सिंधू हिने देखील असाच एक संकल्प केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक क्रमवारीत 'नंबर वन' होण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. नवी दिल्लीत प्रीमिअर बॅडमिंटन लीगचा सामना झाल्यानंतर तिने  सिंधू पत्रकारांशी बोलत होती. 


तिसऱ्या स्थानावर 


जागतिक क्रमवारीत पी.व्ही. सिंधू सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामूळे येणाऱ्या वर्षात ती किती स्पर्धांमध्ये सहभागी होते आणि विजय संपादन करते हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे.


खेळावर लक्ष केंद्रीत 


रॅंकिगचा विचारन मनात न ठेवता खेळावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे पी.व्ही. सिंधूने यावेळी सांगितले.  जर मी सातत्यपूर्ण कामगिरी केली तर आपोआपच मी जागतिक क्रमवारीत 'नंबर वन' असेल असेही ती म्हणाली.