मुंबई: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक मिळालं आहे. क्रीडाप्रेमींसाठी आता एका मोठी बातमी आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये अखेर पी. व्ही. सिंधूनं ब्राँझ मेडल पटकावलं आहे. तिनं ब्राँझसाठीच्या लढतीत चीनच्या हे बिंगजिआओला 21- 13, 21-15 अशा सेटमध्ये हरवत ब्राँझ पदक पटकावलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पी व्ही सिंधूनं अशा प्रकारे सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदकं पटकावणारी सिंधू ही एकमेव भारतीय बॅडमिंटन पटू ठरली आहे. रिओ ऑलिंपिकमध्ये सिंधूनं सिल्व्हर मेडल पटकावलं होतं. भारताला मिळालेलं हे दुसरं मेडल आहे. भारतासाठी ही अतिशन आनंदाची बातमी आहे. पी व्ही सिंधूला ब्राँझ पदक मिळवण्यात मोठं यश आलं आहे. 


सिंधूची सुवर्णपदकाचं स्वप्न मात्र अपूर्णच राहिलं आहे. ताई त्झू यिंगने सिंधूचा पराभव केल्यामुळे तिला सुवर्णपदकापासून दूर राहावं लागलं. मात्र सिंधूला ब्राँझ मेडल मिळालं आहे. ब्राँझसाठी चीनच्या बिंग जिआओसोबत दोन हात करत तिने मात केली आणि ब्राँझ मेडल मिळवलं आहे.