मुंबई : न्यूझीलंड येथे सुरू असलेल्या युवा विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भाच्या आदित्य ठाकरेला पाचरण करण्यात आले आहे. 


त्याच्यामुळे आदित्यला संधी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगवान गोलंदाज इशान पोरेल जायबंदी झाल्याने आदित्य ठाकरे याला बोलावण्यात आले आहे. आदित्य ठाकरे याने नुकत्याच झालेल्या रणजी करंडक अंतिम सामन्यात पदार्पण केले होते.


भारताचा सलग दुसरा विजय


पृथ्वी शॉच्या नेतृत्वातील संघाने सलग दुसरा विजय मिळवत पापुआ न्यू गिनीया संघावर १० विकेट्सने मात दिलीये. याआधी ऑस्ट्रेलिया संघाला मात दिली होती. ऑस्ट्रेलियासोबात झालेल्या सामन्यात त्याने ९४ रन्सची दमदार खेळी केली होती.


आदित्य दुसरा खेळाडू


आदित्य हा अंडर १९ वर्ल्डकपसाठी निवडला गेलेला दुसरा खेळाडू आहे. याआधी फ़ैज फजल हा अंडर १९ वर्ल्डकपमध्ये खेळला होता. फैज हा २००४ मधील वर्ल्डकपचा भाग होता. बांग्लादेशमध्ये झालेल्या या वर्ल्डकपमधून जखमी झाल्याने परत आला होता.