Longest Over Of Internationl Cricket : क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये, गोलंदाज एका षटकात 6 चेंडू टाकतो. जर एखादा चेंडू वाइड किंवा नो बॉल असेल, तर गोलंदाजाला तो चेंडू पुन्हा टाकावा लागेल. पण तुम्हाला माहीत आहे का, एका फास्ट बॉलरने त्याची ओव्हर पूर्ण करण्यासाठी तब्बल 17 चेंडू टाकले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2004 मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात (PAK vs BAN) पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद सामीने हा लाजिरवाणा विक्रम केला होता. 2004 मध्ये कोलंबो येथे झालेल्या आशिया चषक स्पर्धेत त्याने एका ओव्हरमध्ये17 चेंडू टाकले होते. सामीने एका ओव्हरमध्ये 6 चेडूंसह 7 वाईड बॉल आणि 4 नो बॉल टाकले होते. आजही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी ओव्हर म्हणून नोंद आहे. या ओव्हरमध्ये सामीने एकूण 22 धावा दिल्या.


कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठी ओव्हर टाकण्याबाबत बोलायचं झालं तर  हा विक्रम वेस्ट इंडिजच्या कर्टली ॲम्ब्रोसच्या नावावर आहे. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाजांमध्ये कर्टली ॲम्ब्रोसची गणना केली जाते. पण त्याने कसोटी क्रिकेटमधील सर्वात वाईट षटक टाकलं होतं.1997 मध्ये झालेल्या पर्थ कसोटीत कर्टली अम्ब्रोसने हा लाजिरवाणा विक्रम केला होता. त्याने षटकात 9 नो बॉलसह एकूण 15 चेंडू टाकले होते. 


एका ओव्हरमध्ये सर्वाधिक चेंडू टाकण्याच्या विक्रमाबद्दल बोलायचं झालं तर न्यूझीलंडच्या रॉबर्ट वॅन्सच्या नावावर क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठे षटक टाकण्याचा लाजिरवाणा विक्रम आहे. त्याने घरेलू कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये एका ओव्हरमध्ये 22 चेंडू  फेकले होते.