नवी दिल्ली : न्यूझीलंड क्रिकेट टीमने तिसऱ्या वन-डे क्रिकेट मॅचमध्ये शनिवारी पाकिस्तानचा १८३ रन्सने पराभव केला. या विजयासोबतच न्यूझीलंडच्या टीमने सीरिज आपल्या नावावर केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडच्या टीमने आतापर्यंत झालेल्या तिन्ही मॅचेस जिंकल्या आहेत. न्यूझीलंड टीमचा कॅप्टन केन विलियमसन याने म्हटलं की, या सीरिजमधील पाचही मॅचेस जिंकून पाकिस्तानचा सुपडा साफ करायचा आहे.


न्यूझीलंडच्या या विजयात मोलाची कामगिरी केली ती म्हणजे बॉलर बोल्ट याची. बोल्टने जबरदस्त बॉलिंग केली आणि अवघे १७ रन्स देत ५ विकेट्स घेतले. 


न्यूझीलंडच्या टीमने बॅटिंग करत २५७ रन्स केले. त्यानंतर हे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या क्रिकेट टीमने २८ ओव्हर्समध्ये अवघे ७४ रन्स करत ऑल आऊट झाली. 


पाकिस्तानचा स्कोअर १९ ओव्हरमध्ये ३२ रन्स होता. त्यावेळी पाकिस्तानची टीम सर्वात कमी वन-डे स्कोअरवर ऑल आऊट होण्याची शक्यता होती. मात्र, तसं झालं नाही. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी स्कोअर जिम्बाब्वेच्या नावावर आहे.


जिम्बाब्वेची संपूर्ण टीम ३५ रन्सवर ऑल आऊट झाली होती. तर, पाकिस्तानचा सर्वात कमी स्कोअर ४३ रन्स आहे. 


न्यूजीलंडच्या बोल्टने पाकिस्तानच्या अजहर अली, फखर जमान आणि मोहम्मद हाफीज यांना अवघ्या पाच बॉल्समध्येच पेवेलियनमध्ये पाठवलं आणि पाकिस्तानला चांगली सुरुवात करण्यापासून रोखलं.


दहा ओव्हर्सनंतर पाकिस्तानचे तीन विकेट्स ९ रन्सवरच गेले होते. पाकिस्तानच्या टीमकडून सरफराज अहमद (१४ रन्स), मोहम्मद आमिर (१४ रन्स) आणि रुम्मान रईस (१६ रन्स) करत शेवटच्या दोन विकेट्ससाठी ४२ रन्स केले.


न्यूझीलंडच्या केन विलियमसनने ७३ रन्स, रोस टेलरने ५२ रन्स आणि मार्टिन गुप्टिल याने ४५ रन्सची इनिंग खेळली.