यूएई : रंगतदार झालेल्या सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) अफगाणिस्तानवर  (Afghansitan) 1 विकेटने थरारक विजय मिळवलाय. अफगाणिस्तानने पाकिस्तानला विजयासाठी 130 धावांचे आव्हान दिले होते. पाकिस्तानच्या फलंदाजांनी हे आव्हान 4 चेंडूआधी पूर्ण केलं. नसीम शाह पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. नसीमने शेवटच्या ओव्हरमधील पहिल्या दोन्ही बॉलवर सिक्स मारत पाकिस्तानला विजय मिळवून दिलं. या पराभवासह अफगाणिस्तानच्या आणि टीम इंडियाच्या उरल्या सुरल्या आशाही संपल्या. (pak vs afg asia cup 2022 pakistan beat afghanistan by 1 wickets at sharjah cricket stadium)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



अफगानिस्तान प्लेइंग इलेवन : हजरतुल्लाह जजई, रहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी (कर्णधार), करीम जनत, राशिद खान, अजमतुल्लाह ओमरजई, मुजीब उर रहमान, फरीद अहमद मलिक आणि फजलहक फारूकी. 


पाकिस्तान प्लेइंग इलेवन : मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), बाबर आजम (कॅप्टन), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रऊफ, मोहम्मद हसनैन आणि नसीम शाह.