मुंबई : पाकिस्तानचा (Pakistan) वेगवान गोलंदाज आणि माजी कर्णधाराचा भावी जावई शाहिन शाह आफ्रिदी (shaheen shah afridi) हा टॉप 5 गोलंदाजांपैकी एक आहे. शाहिन लवकरच शाहिद आफ्रिदीचा (shahid afridi) जावई होणार आहे. शाहिन त्याच्या भेदक गोलंदाजासाठी ओळखला जातो. मात्र शाहिन आता दुसऱ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. शाहिन फास्टर बॉलर असल्याचं माहितीये. मात्र आता शाहिन स्पिन बॉलिंग करु लागलाय, ते ही टीम इंडियाच्या रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) एक्शनमध्ये. (pak vs aus test series pakistan faster bowler shaheen shah afridi copy ravindra jadeja bowling style video viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिनने नेट प्रॅक्टिसदरम्यान जाडेजा स्टाईल बॉलिंग केली. शाहिन या व्हीडिओमध्ये स्पिन टाकण्याचा प्रयत्न करतोय. याचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना ड्रॉ राहिला. तर दुसरा सामना हा कराचीत पार पडणार आहे. या सामन्याआधी शाहिन नेट्समध्ये कसून सराव करत होता.   


जड्डू नंबर 1 ऑलराऊंडर


जाडेजाने वेस्टइंडिजच्या जेसन होल्डरला (Jason Holder) पछाडत ऑलराऊंडर रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. तर रवीचंद्रन अश्विनची (Ravichandran Ashwin) तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.


जाडेजाला ऑलराऊंडर रँकिंगमध्ये 2 स्थानांचा मोठा फायदा झाला आहे. जाडेजाचे 406 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. जड्डूने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या सामन्यात धमाका केला होता. 


जाडेजाने 228 बॉलमध्ये 178 फोर आणि 3 खणखणीत सिक्ससह नाबाद 175 धावा केल्या. तर पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे 5 आणि 4 अशा एकूण 9 विकेट्स घेतल्या. जाडेजाला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.


बॅटिंग रँकिंगमध्येही धमाका 


जाडेजाला ऑलराउंडर रँकिंगसह बॅटिंग क्रमवारीतही फायदा झाला आहे. जाडेजाने 17 क्रमांकाने मोठी उडी घेत 37 व्या स्थानी झेप घेतली आहे. तर बॉलिंग रँकिंगमध्ये 3 स्थानांच्या फायद्यासह 17 व्या क्रमांकावर पोहचला आहे.