दुबई : दुबईत पार पडलेल्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच सीरिजमध्ये पहिली टेस्ट जिंकण्याचं पाकिस्तानचं स्वप्न स्वप्नचं राहिलंय. उल्लेखनीय म्हणजे, एका मूळ पाकिस्तानी पण ऑस्ट्रेलिया टीमचा सलामी बॅटसमन असलेल्या उस्मान ख्वाजा याच्या शानदार खेळीमुळेच पाकिस्तानचं हे स्वप्न भंगलंय. या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळण्यात आलेली पहिली टेस्ट मॅच ड्रॉ केली.


ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये पाकिस्ताननं चौथ्या खेळीत ऑस्ट्रेलियासमोर ४६२ रन्सचा डोंगर रचला होता. याला प्रत्यूत्तर देताना टेस्टमध्ये सलामी बॅटसमन उस्मान ख्वाजा (१४१), ट्रेविस हेड (७२) आणि कॅप्टन टिम पेननं (नाबाद ६१) रन्सची भर घातली. ऑस्ट्रेलियानं गुरुवारी म्हणजेच पाचव्या आणि शेवटच्या दिवशी दुसऱ्या भागात आठ ओव्हर्समध्ये ३६२ रन्स ठोकत मॅच ड्रॉ करणं भाग पाडलं. ऑस्ट्रेलियानं तीन विकेट गमावत १३६ रन्सवर दिवसाची सुरुवात केली होती. 


पाकिस्तानी बॉलर्स पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे सात विकेट धडाक्यात घेत या सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतील, असं वाटत असतानाच ख्वाजानं पाकिस्तानची ही आशा धुळीला मिळवली. 


अगोदरच्या दिवशी ५० च्या स्कोअरवर नाबाद राहणाऱ्या ख्वाजानं आणि हेडनं चौथ्या विकेटसाठी १३२ रन्सची भागीदारी केली... तो आऊट झाल्यानंतर ख्वाजाला कॅप्टनचीही दमदार सोबत मिळाली... आणि या दोघांनी टीम स्कोअर ३०० च्या पुढे नेला....


परंतु, याच दरम्यान पाकच्या यासिर शाहनं ख्वाजाला पॅव्हेलियनमध्ये धाडलं... आणि पाकिस्तानच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. ख्वाजा ३३१ च्या एकूण स्कोअरवर ऑस्ट्रेलियाचा सहावा विकेट म्हणून पॅव्हेलियनमध्ये परतला. 


परंतु, अखेरीस पहिली टेस्ट मॅच ड्रॉ राहिली... आणि पाकिस्तानचं विजयाचं स्वप्न अपूर्णच राहिलं.