PAK vs ENG 2nd Test Babar Azam : पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यात सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने 26 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि इतिहास रचला आहे. दोन्ही कसोटी सामने जिंकून इंग्लंडने 22 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका जिंकली आहे. मात्र, घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावल्यानंतर कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) टीकेला सामोरं जावं लागत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोमांचक सामन्यात पाकिस्तानला 355 धावांचं टार्गेट पुर्ण करता आलं नाही आणि इंग्लंडने सामना जिंकत मालिकेवर कब्जा मिळवला आहे. मॅचनंतर प्रेस कॉन्फ्रन्समध्ये (Press Conference) दोन्ही कॅप्टनला पत्रकारांच्या प्रश्नांना समोरं जावं लागलं. त्यावेळी एका पत्रकाराने बाबरला गुगली टाकत प्रश्न विचारला. मात्र, त्याला बाबरने जबदस्त उत्तर दिलं.


आणखी वाचा - Suryakumar Yadav सह हे 3 खेळाडू होणार मालामाल; सीनिअर खेळाडूंना मोठा धक्का


अनेक चाहत्यांचे म्हणणं आहे की तू (Babar Azam) आणि रिझवानने (Rizwan) फक्त T-20 वर लक्ष दिलं पाहिजे. कसोटीत तो आऊट होताच संपूर्ण संघाची धांदल उडते. यावर बाबर पत्रकाराला अडवत म्हणाला... मग तुम्हाला काय सोडून देऊ ? त्यानंतर पत्रकाराने आपला प्रश्न समजून सांगण्याचा प्रयत्न केला.


पाहा Video -



दरम्यान, तुम्हाला याबद्दल काय वाटते हा माझा प्रश्न आहे, असं पत्रकार (journalist) म्हणाला. त्यावर सर, आम्ही असा काही विचार करत नाही, असं स्पष्ट उत्तर देत बाबरने फुल्ल स्टॉप लगावला. बाबरच्या उत्तरानंतर (Babar Press Conference) पत्रकार परिषदेत एकच शांतता पसरल्याचं दिसून आलं.