PAK vs ENG: कॅप्टन बाबर आझमने रचला इतिहास; रिकी पाँटिंगच्या `या` बड्या रेकॉर्डची बरोबरी!
Babar Azam, Ricky Ponting: एका बड्या रेकॉर्डच्या बाबतील त्यानं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची बरोबरी (Babar Azam Equals Ricky Ponting Record) केली आहे.
Pakistan vs England, 3rd Test: इंग्लंडविरुद्ध कराची येथे खेळला जात असलेला तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना (PAK vs ENG) रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला 55 धावांची गरज आहे. त्यामुळे आता मालिकेत लाज राखण्यासाठी पाकिस्तानला 8 विकेट घेण्याची गरज आहे. अशातच आता पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमने (Babar Azam) नवा इतिहास रचला आहे. (pak vs eng babar azam equals ricky ponting most 50 plus as captain in a calendar year and complete 1000 run in 2022)
पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना बाबरने 54 धावा केल्या आहेत. दरम्यान, बाबरने चालू वर्षीत कसोटीमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत आणि 2022 मध्ये हा आकडा गाठणारा तो पहिला पाकिस्तानी फलंदाज ठरेल. यासोबतच पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार बाबर आझमने (Captain Babar Azam) आणखी एक मोठा पराक्रम केला आहे.
कॅप्टन म्हणून बाबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका चालू वर्षात सर्वाधिक 50 पेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज बनला आहे. या रेकॉर्डच्या बाबतील त्यानं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची बरोबरी (Babar Azam Equals Ricky Ponting Record) केली आहे. आणखी एक अर्धशतक (Most 50 plus as captain) झळकावल्यास तो रिकी पाँटिंगची बरोबरी करू शकेल.
पाहा ट्विट -
दरम्यान, रिकी पाँटिंगने कॅप्टन (Ricky Ponting Record) म्हणून 2005 साली 24 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या होत्या. त्यानंतर आता 2022 मध्ये बाबर आझमने 24 वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा काढल्या आहेत. 26 डिसेंबरपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. त्यावेळी अर्धशतक करत बाबर नवा इतिहास लिहण्याचा प्रयत्न करेल.