Pak vs Eng : इंग्लंडच्या विजया मागचा `रियल हिरो`! अवघ्या 7 महिन्यात करून दाखवला करिश्मा
ना बॅट हातात घेतली, ना बॉल...मैदानाबाहेरूनच लिहला इंग्लंडच्या विजयाचा इतिहास, कोण आहे हा पडद्यामागील हिरो?
Pak vs Eng : ऑस्ट्रेलियातल्या टी20 वर्ल्ड कपवर (T20 World Cup) इंग्लंडने नाव कोरले आहे. बेन स्टोक्सच्या झंझावती कामगिरीच्या बळावर इंग्लंडने (England) पाकिस्तानचा (Pakistan) 5 विकेटस राखून पराभव करत दुसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरले. इंग्लंडच्या विजयात प्रत्येक खेळाडूचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे संपुर्ण श्रेय या खेळाडूंचे आहे. मात्र यामध्ये एका व्यक्तीचे योगदान विसरता येणार नाही. या व्यक्तीने देखील इंग्लंडच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे हा व्यक्ती कोण आहे, ते जाणून घेऊयात.
हे ही वाचा : मैदानावरचा 'तो' क्षण...अन् पाकिस्तानच वर्ल्ड कप विजयाच स्वप्न भंगलं!
कोण आहे हिरो?
इंग्लंड संघाने वर्ल्ड कप उंचावण्यामागे खरा हिरो हा मॅथ्यू मॉट (Matthew Mott) आहे. मॅथ्यू मॉट हा इंग्लंड संघाचा मुख्य कोच आहे. याच मुख्य कोचने मैदानाबाहेरून सुत्र हलवून इंग्लंडच्या विजयाचा इतिहास लिहला होता. वर्ल्ड कप विजयानंतर इंग्लंडच्या अनेक खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा झाली. मात्र मॅथ्यू मॉटचे (Matthew Mott) नाव चर्चेत आले नव्हते. आता मात्र इंग्लंडच्या विजयातील पडद्यामागचा रियल हिरो समोर आला आहे. आणि आता क्रिकेट वर्तुळातून त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.
विजयी कारकिर्द
मॅथ्यू मॉट (Matthew Mott) यांची मुख्य कोच पदाची कारकिर्द आतापर्यंत खुप चांगली राहिली आहे. मॉट यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाने 3 वेळा वर्ल्ड कपवर नाव कोरले. ऑस्ट्रेलियन महिला संघाने 2018, 2020 मध्ये टी20 वर्ल्ड कप आणि 2022 मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकला होता. यानंतर आता मुख्य कोचपदी आल्यानंतर त्यांनी इंग्लंडला टी20 वर्ल्ड कप 2022 चा विजेता बनवला.
मे 2022 च्या दरम्यान इंग्लंडने टी20 साठी मॅथ्यू मॉट (Matthew Mott) यांची निवड केली होती. मॉट यांच्या निवडीनंतर लगेचच जोस बटलरला इंग्लंड संघाचा कर्णधार करण्यात आले होते. त्यानंतर या जोडगोळीने मिळून अवघ्या काही महिन्यात इंग्लंडला (England) विश्वविजेता बनवला. त्यामुळे मॅथ्यू मॉटच्या कामगिरीची आता सर्वत्र चर्चा होतेय.